पुणे

कान्हूर मेसाई येथे जिल्हास्तरीय शालेय भजन-गवळण स्पर्धा

CD

पाबळ, ता. २७ : कान्हूर मेसाई (ता. शिरूर) येथील विद्याधाम माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय व ग्रामस्थांच्या वतीने आयोजित जिल्हास्तरीय शालेय भजन- गवळण स्पर्धा भक्तिमय वातावरणात पार पडली. या स्पर्धेत पुणे जिल्ह्यातील २२ शाळांनी सहभाग नोंदवला होता.
स्पर्धेत प्रथम क्रमांक विभागून सणसवाडी येथील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय आणि कान्हूर मेसाई येथील विद्याधाम माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय यांनी पटकावला. द्वितीय क्रमांक आळंदी देवाची येथील लक्ष्मीबाई दुराफे स्कूल व शिक्रापूर येथील विद्याधाम हायस्कूल यांनी मिळविला. तृतीय क्रमांक करंदी येथील विद्या विकास मंदिर आणि विठ्ठलवाडी येथील पांडुरंग विद्यालय यांनी पटकावला. तर उत्तेजनार्थ पारितोषिके अष्टापूर येथील न्यू इंग्लिश स्कूल व शिक्रापूर येथील सी. एच. भुजबळ विद्यालय यांना प्रदान करण्यात आली. वैयक्तिक कौशल्य पुरस्कारांत उत्तम पखवाज वादक- कान्हूर मेसाई विद्याधाम हायस्कूल, उत्कृष्ट तबला वादक- रामेश्वर सोनवणे (विठ्ठलवाडी), उत्कृष्ट हार्मोनिअम वादक- ज्ञानेश्वरी कुसेकर (पिंपळे जगताप) आणि उत्कृष्ट गायक- संस्कृती नाणेकर (कान्हूर मेसाई) यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
याप्रसंगी खेड विभागाचे उपविभागीय पोलिस अधिकारी अमोल मांडवे, खेड एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष नानासाहेब टाकळकर, विद्या विकास मंडळाचे सचिव सदाशिव पुंडे, सहसचिव बाळासाहेब पुंडे, संचालक रमेश खर्डे, अमोल पुंडे, अनिल चौधरी यांसह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रकाश चव्हाण यांनी केले. परीक्षक म्हणून माऊली महाराज पिंगळे, सोपान राऊत व बाळासाहेब चव्हाण यांनी काम पाहिले. आभार संतोष घोलप यांनी मानले. या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी विशेष परिश्रम घेतल्याबद्दल पत्रकार ज्ञानेश्वर मिडगुले, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस बबन शिंदे, युवा सरचिटणीस तुषार बिडवे आदींनी परिश्रम घेतले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Arjun Tendulkar ला प्रतिस्पर्धी फलंदाजांनी चांगला चोप दिला; नशीब ललित यादव, दीपराज गावकरने संघाला सावरले, ८ धावांनी जिंकवले

'मौत से क्या डरना, उसे तो आना ही है...' बॅटल ऑफ गलवानचा टीझर आऊट, टीझरमधून बिश्नोई गँगला इशारा?

Latest Marathi News Live Update : मुक्ताईनगर येथील शेतकऱ्यांचा मोजणी न करता जमीन अधिग्रहणास विरोध

Pune News : अनाधिकृत विक्रेत्यांनी व्यापले पदपथ; पुणे महापालिकेसमोरच ठिय्या; साहित्य विक्रीसाठी लहान मुलांचा वापर!

Nashik Municipal Election : भाषण नको, फक्त संवाद! नाशिकचे इच्छुक उमेदवार आता भंडाऱ्यातून गाठताहेत मतदारांचे घर

SCROLL FOR NEXT