पुणे

काय म्हणतात पुणेकर, मंत्री झाले मुरलीधर!

CD

कोथरूड, ता. ९ ः नवनिर्वाचित खासदार मुरलीधर मोहोळ केंद्रीय राज्यमंत्री म्हणून शपथ घेत असताना कोथरूडमध्ये कर्वे पुतळा चौक तसेच मोहोळ यांच्या कार्यालयात भाजप कार्यकर्त्यांनी जोरदार जल्लोष केला. ‘काय म्हणतात पुणेकर, मंत्री झाले मुरलीधर’ असा फलक एका उत्साही कार्यकर्त्याने झळकाविला.
मोहोळ यांच्या कार्यालयाची दर्शनी बाजू भगव्या रंगाच्या फुग्यांनी सजविण्यात आली होती. तेथे मोहोळ यांचे छायाचित्र लावण्यात आले होते. मोठ्या स्क्रीनवर शपथविधी समारंभ पाहण्याची सोय करण्यात आली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी शपथ घेत असताना फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली.
कार्यकर्त्यांनी ‘मोदी, मोदी’, ‘भारत माता की जय’ अशा घोषणा दिल्या., भाग्यश्री बँडच्या तालावर, भाजपाचा झेंडा झळकावीत कार्यकर्ते जल्लोष करीत होते. पक्षाच्या कार्यालयात दिवसभर मिठाईचे वाटप सुरु होते.
मोहोळ यांच्या आई वेणुबाई, पत्नी मोनिका, मुलगी सिद्धी, सौम्या यांच्यासह अनेक मित्र शपथविधी सोहळा पाहण्यासाठी दिल्लीमध्ये प्रत्यक्ष उपस्थित होते.
---

भाऊजींनी आयुष्यभर जे कष्ट केले त्याचे चीज झाले. ते मला आई म्हणूनच हाक मारतात. कोरोना काळात त्यांनी जनतेची सेवा केली. तेव्हा दोन वेळा कोरोना झाला तरी ते स्वस्थ बसले नाहीत. त्यांच्या यशाचा खूप आनंद झाला आहे.
- संगीता मोहोळ (थोरल्या वहिनी)
---

माझे काका आज केंद्रात मंत्री झाले आहेत. येथे कार्यालयात कार्यकर्ते, नागरिक मोठ्या संख्येने जमले आहेत. सर्वांना खूप आनंद झाला आहे. आता आम्ही सगळे जल्लोष करणार आहेत.
- पूजा मोहोळ-रेणुसे (पुतणी)
---

पहिलवान आला!

शपथविधी समारंभ पाहण्यासाठी मोहोळ यांच्या कार्यालयापाशी नागरिक मोठ्या संख्येने लोक जमले होते. शपथ घेण्यासाठी एकेकाचे नाव पुकारले जात होते तशी उत्सुकता वाढत होती. पाऊस आला तरी लोक थांबून होते. मोहोळ यांचे नाव पुकारले जाताच एकच जल्लोष ‌ झाला. आतषबाजी, हलगी आणि बँडच्या तालावर लोक थिरकू लागले. ‘पहिलवान आला, अपना मुरलीधर’ या गीतावर कार्यकर्त्यांनी ठेका धरला.
-----

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gangapur News : अवैध दारू विक्री वाढल्याने वरखेड गावात महिला व ग्रामस्थांनी काढला गांधीगिरी मोर्चा; दारू विक्रीविरोधात ग्रामसभेत ठराव मंजूर

Nilanga News : मदतीसाठी कागदपत्रांचा ससेमिरा! गावाचा एकच पंचनामा करून सरसकट मदत द्या; नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची मागणी

Latest Marathi News Live Update : शिक्षक भरतीत लाखोंची फसवणूक, अपूर्व हिरेंसह पाच जणांवर गुन्हा

Pune News : उजनीतील खासगी मासेमारी ठेका प्रक्रिया रद्द; जलसंपदा विभागाच्या बैठकीत निर्णय

Baramati Crime : शेरेवाडी दुहेरी खूनाचा गुन्हा उघड....; नातलगानेच केला दुहेरी खून....

SCROLL FOR NEXT