पुणे

स्वातंत्र्याबरोबर आलेल्या जबाबदारीचे भान ठेवा माजी लष्करप्रमुख मनोज नरवणे यांचा सल्ला

CD

कोथरूड, ता. १६ ः ‘‘आपल्या देशाला २०४७ मध्ये महासत्ता बनवायची आहे. त्यासाठी आपण करत असलेले काम नियमाप्रमाणे करण्याची आणि देशाच्या प्रगतीसाठी करण्याची भावना मनात बाळगली पाहिजे. स्वातंत्र्याबरोबर आलेल्या जबाबदारीचे भान ठेवा.’’ असा सल्ला माजी लष्करप्रमुख मनोज नरवणे यांनी दिला.
संस्कृती प्रतिष्ठानतर्फे गुणवंत विद्यार्थी गौरव समारंभ कोथरूडमधील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात रविवारी सकाळी आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी नरवणे बोलत होते. याप्रसंगी केंद्रीय नागरी विमान वाहतूक व सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, क्रिकेटपटू केदार जाधव, पुणे श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष ब्रिजमोहन पाटील, अभिनेते-दिग्दर्शक प्रवीण तरडे आदी उपस्थित होते. यावेळी सातशे गुणवंत विद्यार्थ्यांना गौरविण्यात आले. समारंभाचे हे २३ वे वर्षे होते. स्वामी विवेकानंद आणि पंतप्रधान मोदी यांच्यावरील पुस्तक, शैक्षणिक साहित्य आणि सन्मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप होते.
मोहोळ म्हणाले, ‘‘आपल्या तरुणांचे भवितव्य उज्ज्वल आहे. हीच तरुण पिढी भारताला पुढे नेईल. गुणवंत विद्यार्थी हे प्रतिभावंत कसे होतील, हा प्रयत्न आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे देशाला सर्वोच्च स्थानी पोहचविण्याचे स्वप्न आपण सर्व मिळून पूर्ण करू.’’
माजी नगरसेविका व संस्कृती प्रतिष्ठानच्या अध्यक्षा मोनिका मोहोळ, हर्षाली माथवड, वासंती जाधव आदी व्यासपीठावर उपस्थित होते. मिलिंद कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले. हर्षल दारकुंडे यांनी गुणवंत विद्यार्थी सत्कार कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

फोटो ः 13094

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPS Officers Transfers: महाराष्ट्रात पोलीस दलात मोठा फेरबदल! २१ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदली; कुणाची कुठे नेमणूक? जाणून घ्या यादी...

IPL 2026 Point Table: गुजरात टायटन्सने विजय मिळवून PlayOff ची चुरस अधिक रंजक बनवली; रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूवर सहज मात

HSC Result: मोठी बातमी! महाराष्ट्र बोर्डाच्या १२वी निकालाची तारीख जाहीर, कधी आणि कसा पाहता येणार? जाणून घ्या संपुर्ण प्रक्रिया

GT vs RCB Live: एवढा राग...! शुभमन गिलची कॅच घेतल्यावर विराट कोहलीने काय केलं? त्याच्याकडून अशी अपेक्षा नव्हती Video Viral

Pune News : पोलिस महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर; पुणे, पिंपरी-चिंचवड आणि पुणे ग्रामीणमधील ३२ अधिकारी, अंमलदारांचा समावेश

SCROLL FOR NEXT