कोथरूड, ता. २४ ः भल्या मोठ्या कॅमेऱ्यात टाकलेल्या फोटोमधून माणूस बाहेर आला अन् प्रेक्षकांनी टाळ्यांचा कडकडाट केला. आजोबा रघुवीर आणि वडील विजय रघुवीर यांच्याकडून जादूची कला शिकलेल्या जितेंद्र रघुवीर यांनी आपला विक्रमी १६,११८ वा प्रयोग रविवारी कोथरूडमधील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात सादर केला. चित्तथरारक जादूने लहान बालकांबरोबर त्यांचे पालकही अडीच तास खिळवून ठेवले. पुढे काय होणार याची उत्सुकता निर्माण करत प्रेक्षकांना आश्चर्यचकित करायचे आणि प्रेक्षकांकडून टाळ्यांच्या कडकडाट मिळवायचा हे जादूगार जितेंद्र रघुवीर यांच्या आजच्या प्रयोग सादरीकरणात पुन्हा एकदा ठळकपणे दिसले.
जादूगार जितेंद्र रघुवीर यांचा ‘सकाळ’ प्रस्तुत स्पेशल ग्रँड शो आयोजित करण्यात आला होता. आजच्या शोमध्ये युरोप, सिंगापूर, अमेरिकेतून आणलेल्या नवीन जादूसोबत नऊ फुटी जॅपनीज डायनासोर आणि डेड्यूल प्रेक्षकांना पाहायला मिळाले.
जादू कशी करावी, कशी शिकावी याबद्दल माहिती देताना जादूगार जितेंद्र रघुवीर म्हणाले की, जादूला विज्ञानाचा भक्कम पाया आहे. जिथे कल्पनाशक्ती संपते तिथे जादू सुरू होते.
जादू विषयावरील पुस्तके व जादूच्या साहित्याचे कीट या वेळी विक्रीसाठी उपलब्ध करण्यात आले होते.
माणसाचे दोन तुकडे, हवेत अधांतरी होणारी मुलगी, नोटांचा पाऊस, मास्टर ऑफ प्रेडिक्शन, माणूस गायब, प्रेक्षकांच्या हातातून रिंग आरपार असे इजिप्शियन, अमेरिकन जॅपनीज, अरेबिक जादूंचे चित्तथरारक प्रयोग अनुभवायला मिळाले. जादूगर जितेंद्र हे वयाच्या पाचव्या वर्षापासून जादूचे प्रयोग करत आहेत. आजच्या प्रयोगात रघुवीर यांच्या चौथ्या पिढीने देखील सहभाग घेत आपली कला सादर केली. त्याला प्रेक्षकांनी टाळ्यांनी दाद दिली.
कोथरूड ः जादू सादर करताना जादूगार जितेंद्र रघुवीर.
जादूगार जितेंद्र रघुवीर यांचा कार्यक्रम पाहायला जमलेले प्रेक्षकवर्ग
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.