पुणे

कॉसमॉस बॅंक सायबर हल्ला प्रकरणातील आरोपींना शिक्षा

CD

पुणे, ता. २२ : महाराष्ट्रासह देशाला हादरविणाऱ्या कॉसमॉस बॅंक सायबर हल्ला प्रकरणातील आरोपींना पुणे सत्र न्यायालयाने शिक्षा सुनावली. या प्रकरणामध्ये अटक केलेल्या १८ पैकी ११ आरोपींना न्यायालयाने साडेतीन ते चार वर्षांपर्यंतची शिक्षा सुनावली.
सायबर गुन्हेगारांनी बँकेचा स्वीच सर्व्हर हॅक करून तब्बल ९४ कोटी रुपये काढले होते.
गणेशखिंड येथील कॉसमॉस बॅंकेच्या मुख्यालयात ११ ते १३ ऑगस्ट २०१८ दरम्यान सायबर चोरट्यांनी मुख्यालयातील एटीएम स्वीच (सर्व्हर) हॅक करून तीन दिवसात ९४ कोटी ४२ लाख रुपये इतकी रक्कम लुटली होती. त्यापैकी बहुतांश रक्कम भारतासह २६ देशांमधील एटीएममधून काढली होती. तर हाँगकाँगमधील हेनसेंग बॅंकेतील ए.एल.एम ट्रेडिंग लिमिटेड या खात्यावर १३ कोटी रुपये वर्ग केले होते. दरम्यान, या प्रकरणाच्या तपासासाठी सायबर गुन्हे शाखेच्या तत्कालीन पोलिस उपायुक्त ज्योतीप्रिया सिंह यांच्या मार्गदर्शनाखालील वरिष्ठ पोलिस निरीक्षक जयराम पायगुडे यांच्या पथकाने महाराष्ट्र, राजस्थान, उत्तरप्रदेश येथून आत्तापर्यंत १७ ते १८ जणांना अटक केली आहे.
संबंधित प्रकरण पुणे सत्र न्यायालयात दाखल होते. सायबर पोलिसांकडून आरोपीविरुद्ध पुरावे सादर करून आपली बाजू मांडण्यात आली होती. त्यानुसार, या प्रकरणामधील आरोपींना न्यायालयाने शनिवारी (ता. २२) शिक्षा सुनावली. फाहीम मेहफुज शेख, फहीम अझीम खान, शेख मोहम्मद अब्दुल जब्बार, महेश साहेबराव राठोड, नरेश लक्ष्मीनारायण महाराणा, मोहम्मद सईद इकबाल हुसेन जाफरी ऊर्फ अली, युस्टेस अगस्तीन वाझ ऊर्फ अँथोनी, अब्दुल्ला असर्फली शेख, बशर अहमद अब्दुल अजीज शेख, सलमान मोहम्मद नईम बेग, फिरोज यासीन शेख, अशी शिक्षा सुनावण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. आरोपींना साडेतीन ते ४ वर्षापर्यंतची शिक्षा सुनावली आहे.

अटक केलेल्या आरोपींची संख्या : १८
- पोलिसांनी परत मिळविलेली रक्कम : ६ कोटी
- दोषारोप पत्र दाखल : १७०० पानांच्या मुख्य दोषारोपत्रासह दोन पुरवणी दोषारोपपत्र

-बनावट कार्ड : ४२३
-भारतातील एटीएममधून काढलेली रक्कम - अडीच कोटी
- झालेले व्यवहार - २ हजार ८००
- व्हिसा कार्ड - ७८ कोटी (व्यवहार १२ हजार)
- रुपे : अडीच कोटी (व्यवहार २४४९)
- स्विफ्ट ट्रान्झॅक्‍शन : १३ कोटी ९२ लाख (व्यवहार ३)
एकूण रक्कम : ९४ कोटी ४२ लाख

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shiv Sena Symbol Dispute : दोन्ही गटांना नवे नाव, चिन्हे का दिली नाहीत? शिवसेना पक्षाच्या सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाचा सवाल

India ODI Squad : भारताच्या वनडे संघात Rishabh Pant ला का मिळाली नाही संधी? ही असू शकतात ३ महत्त्वाची कारणं

Latest Marathi News Update : भाजपच्या माजी आमदारावर गुन्हा, मध्यरात्री तरूणीला फार्महाऊसवर बोलवून गैरकृत्य

Gokul Milk Union : गोकुळमधील अवसायनातील संस्थांना दिलासा, सर्वोच्च न्यायालयातील याचिका फेटाळली; ४९२ संस्थांचा मतदानाचा अधिकार कायम

‘देवमाणूस’नंतर किरण गायकवाडची नवी इनिंग; राजकारण अन् गुन्हा… ‘एफआयआर नं. ४६९’मध्ये नेमकं काय पाहायला मिळणार?

SCROLL FOR NEXT