पुणे

भांडायला वेळ आहे; पण बोलायला नाही

CD

गेल्या काही दिवसांपासून जनूभाऊ काहीतरी व्यवसाय करण्याच्या विचारात होते. पण नेमकं काय करावं, हे त्यांना सुचत नव्हतं. तसं त्यांनी अनेक छोटे-मोठे व्यवसाय करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, व्यवसाय करण्यापेक्षा ग्राहकांची जिरवणे, हाच एककलमी कार्यक्रम त्यांनी राबविल्याने त्यांचे सगळेच व्यवसाय अल्पजीवी ठरले होते. मात्र, त्याची त्यांना फिकीर नव्हती. ‘एकवेळ रस्त्यावर आलो तरी चालेल. मात्र, लोकांशी वाद घालणं, थांबवणार नाही’ असा त्यांचा बाणा होता.
आपल्या वाद घालायच्या शैलीचा आपण व्यवसायात रूपांतर करू शकतो, का अशी कल्पना त्यांना काही दिवसांपूर्वी सुचली आणि त्यावर त्यांनी कामही केले. त्यातूनच ‘भांडा आणि जिरवा क्लासेस’चा जन्म झाला. पुण्यात कशाचेही क्लासेस जोरात चालतात. त्यामुळे आपण लोकांना शास्त्रशुद्ध भांडण करायला शिकवलं तर तेही जोरात चालतील, याची त्यांना खात्री होती. ‘तात्त्विक वादापासून हातघाईच्या भांडणापर्यंतचे सगळे प्रकार प्रॅक्टिकलसह शिकवले जातील.’
‘मुद्देसूद आणि विषयानुरूप कसे भांडाल?’ ‘किमान शब्दांत, कमाल अपमान करा’ ‘दुकानदारांपासून पीएमटीपर्यंत आणि रिक्षावाल्यांपासून वाहतूक पोलिसांपर्यंत एका तासांत फाडफाड भांडा,’ ‘सासूची जिरवा,’ ‘सुनेला ताळ्यावर आणा’ ‘कोणतंही कारण नसताना, नवऱ्याशी भांडून त्याला वठणीवर कसं आणाल?’
‘तीन महिन्यांत ‘भांडकुदळ शिरोमणी’ ही पदवी मिळवा.’ अशा पाट्या त्यांनी क्लासेसच्या दर्शनी भागात लावल्या. काही दिवसांनी एक गृहस्थ जनूभाऊच्या क्लासेसमध्ये आले. ‘‘मला भांडणाची खूप खुमखुमी येते. दुसऱ्यांची जिरवावी, असंही वाटतं. मात्र, माझं सगळं बरोबर असूनही नेमकं वाद घालायच्यावेळी माझी जीभ जड होते. तुमच्या येथे भांडण शिकून गेलो तरी ऐन रणांगणात भांडण रंगात आले असताना मी माघार घेईल, अशी भीती मला वाटते. अशावेळी मी काय करावं.’’ गृहस्थाने अजिजीने म्हटले.
‘‘तुमची जीभ जड आहे तर डॉक्टरांकडे जा. नाहीतर घरच्याघरी कानसीने जीभ तासून पातळ करा.’’
जनूभाऊंनी सल्ला दिला.
‘‘अहो जीभ जड होते म्हणजे इच्छा असूनही बोलता येत नाही. तोंडाला कुलूप लावल्यासारखी अवस्था होते. अशावेळी तुमच्या क्लासेसमधील कोणी भाडेतत्त्वावर तात्त्विक भांडायला मिळेल का? तुमची जी काही फी असेल, ती मी आगाऊ भरायला तयार आहे.’’ त्या गृहस्थाने असं म्हटल्यावर जनूभाऊंचा चेहरा उजळला. ‘फी घेऊन लोकांच्यावतीने भांडता येते’ ही कल्पनाच त्यांना आवडली. त्यांनी लगेच होकार दिला. सध्या सकाळी आठ ते दुपारी एकपर्यंत ते दुसऱ्यांसाठी मुद्देसूद भांडायला जात आहेत. त्यानंतर क्लासेसमध्ये वाद घालायला शिकवतात. सध्या त्यांचा व्यवसाय एवढा तेजीत आहे, की लोकांशी बोलायलाही त्यांना वेळ नाही. ‘भांडायला वेळ आहे; पण बोलायला नाही’ अशी त्यांच्या आयुष्याची टॅगलाईन झाली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Riots: मुंबईतील 1992च्या दंगलीतील खटले निकाली काढा; सुप्रीम कोर्टाचे सरकारला निर्देश

IPL 2024 MI vs SRH Live Score: मुंबईला कमिन्सचा जोरदार धक्का! रोहित शर्माला 4 धावांवरच धाडलं माघारी

Vijay Wadettivar: वडेट्टीवारांविरोधात भाजपची निवडणूक आयोगात तक्रार; मुंबई हल्ल्यावरील विधानावर केलं होतं भाष्य

Arvind Kejriwal: नायब राज्यपालांकडून केजरीवाल पुन्हा टार्गेट! खलिस्तान्यांकडून पैसा घेतल्याची केली NIAकडं तक्रार

Team India Jersey: T20 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडिया दिसणार नव्या रुपात, नवी जर्सी झाली लाँच; पाहा Video

SCROLL FOR NEXT