पुणे

पुण्यात सलग तिसऱ्यादिवशी पूर्वमोसमी पावसाची हजेरी

CD

पुणे, ता. १ : पूर्वमोसमी पावसाने गुरुवारी (ता. १) शहर व परिसरात सलग तिसऱ्या दिवशीही हजेरी लावली. मेघगर्जना, वादळी वारे अन् काही भागात गारांचा पाऊस झाला. एकीकडे कमाल तापमानाचा पारा ४० अंशाच्या घरात असल्याने दिवसा उन्हाचा ताप आणि दुपारनंतर पडणारा पाऊस अशी स्थिती सध्या पुण्यात आहे. शुक्रवारी (ता. २) पुणे व परिसरात दिवसा उष्ण वातावरण राहणार असून, दुपारनंतर मात्र ढगाळ वातावरण होत पावसाची शक्यता हवामानशास्त्र विभागाने वर्तवली आहे.

गेल्या तीन दिवसांपासून शहरासह उपनगरांमध्ये पावसाची नोंद होत असून, काही भागांत तर वादळी वाऱ्यांसह गारांचा पाऊस पडत आहे. गुरुवारी सकाळपासून उन्हाचा झळा कायम होत्या. मात्र दुपारनंतर पुण्याच्या पश्चिम भागात ढग निर्माण होऊ लागले. त्यानंतर मात्र जिल्ह्यातील विविध भागांत ढगाळ वातावरण आणि सोसाट्याचे वारे, विजांचा कडकडाटासह शहर आणि उपनगरांमध्ये पावसाच्या जोरदार सरी पडल्या. सांगवी, बाणेर या भागात गारांसह जोरदार पाऊस पडला. शिवाजीनगर, खडकवासला, वडगाव शेरी, खराडी, विमाननगर, औंध, पाषाण, सुतारवाडीसह विविध ठिकाणी वाऱ्यांसह माध्यम ते जोरदार पाऊस पडला.

शहरात गुरुवारी ४०.१ अंश सेल्सिअस कमाल तापमान तर सायंकाळी ०.९ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. तर सरासरीपेक्षा तापमानात ४ अंशांनी वाढ झाली होती. जिल्ह्यात बऱ्याच ठिकाणी कमाल तापमानाचा पारा ४० अंशाच्या दरम्यान होता. हवामानशास्त्र विभागाने दिलेल्या माहितीनुसार, जिल्ह्यातील बऱ्याच ठिकाणी पुढील आठवडाभर कमाल तापमानाचा पारा ४० अंशाच्या दरम्यान असेल. त्यामुळे उन्हाच्या झळा अशाच कायम राहणार आहेत. तर पुणे आणि परिसरात येत्या दोन ते तीन दिवस दुपारनंतर पावसाचा अंदाज आहे.

पुणे व परिसरात झालेला पाऊस (मिलिमीटरमध्ये)
पुणे शहर : ०.९
पाषाण : ७.५
एनडीए : ०.५
लवळे : ०.५

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana ₹1500 Installment : लाडक्या बहिणींच्या खात्यात 3000 ऐवजी किती पैसे जमा झाले? घरबसल्या मोबाईलवर मिनिटांत तपासा रक्कम; कशी पाहाल स्टेटस?

Udaipur ₹2 Crore Bribery Case : एसीबीच्या जाळ्यात सापडला मोठा मासा? तब्बल 2 कोटी रुपयांची घेतली लाच; एसओजी अधिकाऱ्याच्या नावाने पैसे घेणारा दलाल जाळ्यात

रेसलिंग विश्वावर शोककळा! सामना खेळल्यानंतर दुसऱ्याच दिवशी ४० वर्षांच्या WWE स्टार PAC चे निधन

Latest Marathi News Live Update: गुंज परिसरात पिसाळलेल्या कुत्र्याचा धुमाकूळ; ३० जणांना चावा

Pune Cleanliness Drive: पुण्यात अस्वच्छता करणाऱ्यांकडून ८ महिन्यांत १.८७ कोटींचा दंड; दंडवाढीचा प्रस्ताव तयार

SCROLL FOR NEXT