राजा रवीवर्मा कलादालनात सहा जणींचा चित्राविष्कार
पुणे, ता. १५ : अमूर्त चित्रशैलीत अभावाने दिसणाऱ्या महिला कलावंतांपैकी सहाजणींच्या प्रतिभेचा उन्मुक्त आविष्कार पाहण्याची संधी घोले रस्त्यावरील राजा रविवर्मा कलादालनात येत्या रविवारपर्यंत (१८) रसिकांसाठी खुली आहे. जलरंग, संमिश्र माध्यम व त्यात कागदाच्या घड्यांचा वैशिष्ट्यपूर्ण उपयोग विशेष पाहण्यासारखा आहे, अशी माहिती कलादालनाच्या क्युरेटर प्रियंवदा पवार यांनी दिली.
गायत्री देशपांडे, दीप्ती मुनोत, धनश्री देशमुख, स्नेहल गोयल, धृती महाजन व मानसी पळशीकर यांची पंच्याहत्तर चित्रे प्रदर्शित करण्यात आली आहेत. गायत्री यांनी चित्रांद्वारे निसर्गाशी साधलेले हितगूज मनाला स्पर्शून जाते. दीप्ती यांच्या चित्रांतील फुलपाखरे व इतर सजीवांचे अस्तित्व विलोभनीय दिसते. धनश्री यांच्या चित्रांमधील रंगांची उधळण त्यांच्या मनाची असीमता व अथांगता दर्शवते. स्नेहल यांच्या चित्रांमधील तरलता व निसर्गाचे सहजसुंदर रेखाटन प्रतिबिंबसारखा अनुभव देते. धृती यांच्या चित्रांमध्ये त्रिकोण व चौकोन या भौमितिक आकृत्यांमधील प्रतीकात्मकता उलगडून दाखवण्यात आली आहे. मानसी यांच्या चित्रांमधून त्यांनी घेतलेला आध्यात्मिकतेचा आंतरिक शोध लक्षात येतो. ''अनव्हेलिंग पर्स्पेक्टिव्ह'' या शीर्षकाचे हे प्रदर्शन, सकाळी अकरा ते सायंकाळी सात या वेळेत सर्वांसाठी खुले आहे.
-----
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.