पुणे

अभियांत्रिकीच्या पुनर्परीक्षेविरोधात एनएसयूआयचे आंदोलन

CD

पुणे, ता. ८ ः अभियांत्रिकीच्या द्वितीय वर्षाच्या परीक्षेत अभ्यासक्रमाबाहेरील ४० टक्के प्रश्न विचारले गेलो होते. त्यामुळे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन विभागाने पुनर्परीक्षा घेण्याचे जाहीर केले होते. मात्र, या विरोधात नॅशनल स्टुडंट्स युनियन ऑफ इंडियातर्फे (एनएसयूआय) तर्फे विद्यापीठात आंदोलन करण्यात आले.

शनिवारी विद्यापीठाच्या मुख्य इमारती समोरील आंदोलन करण्यात आले. यावेळी कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधल्यांतर आंदोलन मागे घेण्यात आले. यावेळी राज्य युवक काँग्रेसचे सरचिटणीस अक्षय जैन म्हणाले, ‘‘विद्यापीठ प्रशासनाचा दरवर्षी वेगवेगळ्या प्रकारे गोंधळ सुरूच असतो. पेपर सेट करताना इतकी मोठी चूक केल्यानंतर लक्षातही न येणं ही मोठी शोकांतिका आहे. विद्यापीठाच्या चुकीचा फटका आम्ही का सोसावा. असा प्रश्न उपस्थित करत असून, पुन्हा परीक्षा न घेता सर्व विद्यार्थ्यांना ग्रेस गुण द्यावे.’’


एकदा पेपर दिल्यानंतर पुढील काही दिवसात त्याच विषयाचा पेपर देण्याची आम्हा विद्यार्थ्यांची मानसिकता नाही. त्यामुळे विद्यापीठाने हा पेपर रद्द करावा, अशी भूमिका विद्यार्थ्यांनी कुलगुरूसमोर बोलून दाखवली. मात्र, परीक्षा न घेता गुण देणे शक्य नाही. त्यामुळे परीक्षेला सामोरे जावे लागेल, अशी समजूत विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी यांनी काढली. यावेळी युवक काँग्रेस सचिव आदिनाथ जावीर, नॅशनल स्टुडंट्स युनियन ऑफ इंडियाचे पुणे जिल्हा सरचिटणीस महेश कांबळे, छात्रभारती पुणे जिल्हा सदस्य अजय बनसोडे आदी सहभागी झाले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jitendra Awhad: छत्रपती शिवाजी महाराजांबाबत आव्हाडांचे वादग्रस्त विधान; विधानसभेत गदारोळ

घरकूल लाभार्थीकडून 12,000 लाच घेणारा ग्रामसेवक व शिपाई पकडला! 20 हजाराची मागणी, 15 हजार द्यायचे ठरले अन्‌ 12 हजार घेतले, वाचा...

Pune Crime: पुण्यात अपघाताच्या बहाण्याने वाहनचालकांना लुटणारे मेरठचे दोघेजण गजाआड; गाडी पायावरून गेल्याचा बनाव अन्..

बापाचाच लेकीवर अत्याचार! अल्पवयीन मुलगी गर्भवती, आजारी असल्याने माढ्यातील दवाखान्यात गेली, डॉक्टरांनी तपासणी केली अन्‌...

Pune News: पुणे महापालिकेने केली तब्बल ८०० कोटीची करमाफी; चार महिन्यात १ हजार ७० कोटीची वसूली, काय आहे अभय योजना?

SCROLL FOR NEXT