पुणे

‘पुणे महापालिकेला सीएसआरमधून मिळालेला निधी बँकेत पडून’

CD

पुणे, ता. ११ : पुणे महापालिकेला कोरोनाच्या काळात अनेक कंपन्यांकडून ‘सीएसआर’च्या माध्यमातून ७ कोटी २२ लाख रुपयांचा निधी उपलब्ध झाला. पण, त्यापैकी केवळ एक कोटी ३० लाख रुपये आतापर्यंत खर्च झाले आहेत. त्याचा वापर केला गेला नसल्याने पुणेकर आरोग्य सुविधांपासून वंचित असल्याचा आरोप सजग नागरिक मंचाने केला आहे.

कोरोनाच्या काळात आरोग्य सुविधा निर्माण करण्यासाठी महापालिकेने मोठ्या प्रमाणात निधी खर्च केला. शहर व जिल्ह्यातील अनेक मोठ्या कंपन्यांकडे मदतीसाठी आवाहन केले होते. त्यास प्रतिसाद देत अनेक कंपन्यांनी वैद्यकीय उपकरणांसह रोख रक्कम महापालिकेला मदत म्हणून दिली. यात २०२०-२१ मध्ये ४ कोटी ८९ लाख, २०२१-२२ मध्ये ३ कोटी १० लाख रुपयांची रोख रक्कम जमा झाली. त्यापैकी १ कोटी ३० लाख रुपये बेड व ऑक्सिजनवर खर्च केले आहेत. बँकेत जमा असलेल्या ७ कोटी २२ लाख रकमेवर ५४ लाख रूपये व्याज मिळाले आहे, असे माहिती अधिकारात मिळालेल्या माहितीत पुढे आले.

आरोग्याअभावी कोरोनाकाळात नागरिकांचे हाल झाले. महापालिकेला दिलेल्या निधीचा योग्य पद्धतीने वापर झाला नाही. बँक खात्यात हा निधी पडून राहिल्याने त्याचा नागरिकांसाठी काहीच उपयोग होत नाही. प्रशासनाने या निधीचा योग्य पद्धतीने वापर करून नागरिकांना आरोग्य सुविधा द्याव्यात.
-विवेक वेलणकर, अध्यक्ष, सजग नागरिक मंच

‘सीएसआर’ निधीचा वापर करण्यासाठी महापालिका आयुक्तांकडे प्रस्ताव ठेवून त्याचा योग्य पद्धतीने वापर करण्यात येईल.
- डॉ. भगवान पवार, आरोग्य प्रमुख, महापालिका

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Local: महिला प्रवाशांसाठी मोठी बातमी! मुंबई लोकलमध्ये ‘पिंक कोच’ सुरू होणार; सुरक्षित प्रवासासाठी नवा उपक्रम

Beed Crime: परळीत अल्पवयीन मुलीवर पाशवी अत्याचार; दोन नराधमांविरुद्ध पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल

Gas Cylinder Issue : ना आंघोळ, ना जेवण, गॅस साठी वणवण; गॅस सिलिंडरसाठी ग्राहकांनी गाठले पोलीस ठाणे

Latest Marathi News Live Update : कुस्ती महासंघाच्या विरोधात ISWAI ची पुणे कोर्टात धाव

महाराष्ट्रासाठी मोठी बातमी! मुंबई-पुणे एक्सप्रेसवे मिसिंग लिंक पूर्ण; पहिला ड्रोन व्हिडिओ आला समोर, उद्घाटनाची तारीख काय?

SCROLL FOR NEXT