पुणे

नाईक बेटाच्या टीडीआरची फाइल घेतली मागे

CD

पुणे, ता. १८ : संगमवाडी येथील नाईक बेटाच्या भूखंडाच्या बदल्यात हस्तांतरणीय विकास हक्क (टीडीआर) मिळावा, यासाठी पुणे महापालिकेत दाखल केलेला प्रस्ताव संबंधित बांधकाम व्यावसायिकाने मागे घेतला आहे. याला बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी दुजोरा दिला आहे. दरम्यान, या ‘टीडीआर’ची किंमत तीन हजार कोटी रुपयेइतकी होत असतानाही प्रस्ताव मागे घेतल्याने याची महापालिकेत चर्चा रंगली आहे.
संगमवाडी येथील सिटी सर्व्हे क्रमांक ९३ मध्ये हा मुळा-मुठा नदीच्या संगमाजवळ ३२ एकर २२ गुंठ्यांचा भूखंड आहे. दाट झाडी असलेल्या या बेटावर कोणतीही वस्ती नाही. पावसाळ्यात अनेकदा या बेटाचा काही भाग पाण्याखाली जातो.
महापालिकेने २०१३ मध्ये जुन्या हद्दीचा प्रारूप विकास आराखडा प्रसिद्ध केला होता. त्या वेळी तेथे शेतीऐवजी उद्यानाचे आरक्षण टाकले होते. दरम्यान, संबंधित बांधकाम व्यावसायिक उद्यानासाठी आरक्षित असलेली ही जागा महापालिकेच्या ताब्यात देऊन त्या बदल्यात ‘टीडीआर’ घेणार असल्याची चर्चा गेल्या काही महिन्यांपासून महापालिकेत सुरू होती. त्यातच काही दिवसांपूर्वी विधी विभागाने जाहीर प्रकटन काढून ‘टीडीआर’च्या प्रस्तावावर हरकती मागविल्या होत्या. त्यामुळे महापालिकेने ‘टीडीआर’ देण्याच्या प्रक्रियेस प्रारंभ केला असल्याचे स्पष्ट झाले होते. याबाबत ‘सकाळ’ने आजच्या अंकात वृत्त प्रसिद्ध केले होते.
संबंधित बांधकाम व्यावसायिकाने महापालिकेला पत्र देऊन ‘टीडीआर’ची फाइल मागे घेतली आहे. यामागचे कारण समजू शकले नसले तरी ‘टीडीआर’ देण्यासंदर्भातील पुढील कोणतीही प्रक्रिया झाली नसल्याचे बांधकाम विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Delhi Airport: दिल्ली विमानतळावर थरारक क्षण! दोन विमानांच्या पंख्याची धडक, काही सेकंदांत वाचले शेकडो जीव

भारतातील नवीन ग्रॅज्युएट्ससाठी AI स्पेशलिस्ट' अन् 'कंटेंट क्रिएटर' ठरतायेत टॉप करिअर ट्रेंड्स! LinkedIn ‘Grads Guide 2026’ अहवाल

Pali News : प्रवाशांचे हाल थांबणार! सर्व अडथळे दूर करत रोहा-पुणे एसटी अखेर बसस्थानकात दाखल

Who is Navnita Gautam? विराट कोहली, स्मृती मानधना यांना 'फिट' ठेवणारी नवनीता गौतम; RCB ने तिच्यासाठी घेतलेला ऐतिहासिक निर्णय

Latest Marathi News Live Update : हरिवंश यांची राज्यसभेचे उपसभापती म्हणून निवड केली जाईल

SCROLL FOR NEXT