पुणे

इनोव्हेशन अॅन्ड लिडरशीप इव्हेंट

CD

भारत दर्जेदार तंत्रज्ञान बनवू शकतो ः राममूर्ती

पुणे, ता. ८ ः ऊर्जेच्या कमतरतेमुळे युरोपने ऊर्जा बचतीचे, कामगारांच्या अभावामुळे अमेरिकेने स्वयंचलित आणि जागेच्या कमतरतेमुळे जपानने कॉम्पॅक्ट तंत्रज्ञान विकसित केले. त्याचप्रमाणे जगातील सर्वात मोठी लोकसंख्या असलेला भारत किफायतशीर आणि दर्जेदार तंत्रज्ञान बाजारपेठेत आणू शकतो, असा विश्वास व्यवस्थापन शास्त्रातील तज्ज्ञ प्राध्यापक रवी राममूर्ती यांनी व्यक्त केला.
कोथरूड येथील एमआयटी डब्ल्यूपीयू विद्यापीठात आयोजित ‘इनोव्हेशन अॅन्ड लिडरशीप इव्हेंट''मध्ये ते बोलत होते. सकाळ प्रकाशन आणि एमआयटी डब्ल्यूपीयू विद्यापीठाच्या वतीने डी.एस. प्रसन्ना लिखित इनोव्हेटिव्ह लोकली टू वीन'' आणि राममूर्ती लिखित ‘रिव्हर्स इनोव्हेशन इन हेल्थ केअर'' या पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी कुलगुरू डॉ. आर.एम. चितळे. क्रस्ना डायग्नॉस्टीक्सचे पल्लवी जैन, गिरीश वरदाडकर, डॉ. मिलिंद पांडे, सकाळ प्रकाशनचे आशुतोष रामगिर उपस्थित होते.
राममूर्ती आणि प्रसन्ना या दोन दिग्गजांनी एकमेकांशी संवाद साधत मनुष्यबळ व्यवस्थापनापासून ते औद्योगिक जगतातील बदलांपर्यंतचा आढावा घेतला. प्रसन्ना यांनी सांगितले की, नवसंशोधन हे भारतात नेहमी ‘मिशन मोड'' मध्येच झाले. डिजिटल तंत्रज्ञानाच्या माध्यमातून आपण अशक्य गोष्टी शक्य करीत आहोत. त्यामुळे येत्या काळात भारतात नक्कीच जग बदलविणारे तंत्रज्ञान विकसित होईल.
उत्पादनातील शेवटच्या टप्प्यात सहभागी होणे म्हणजे ‘मेक इन इंडिया‘ नाही, असे स्पष्ट मत राममूर्ती यांनी व्यक्त केले. ते म्हणाले की, " उत्पादनांच्या जोडणीच्या पलीकडे जात, मूलभूत आणि महत्त्वपूर्ण तंत्रज्ञानाच्या विकासाकडे आपल्याला लक्ष द्यावे लागणार आहे. चीनच्या कंपन्यांनी हे तंत्रज्ञान आत्मसात करून स्वतःला सिद्ध केले. स्थानिक गरजांनुसार तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी भारताला प्रयत्न करावे लागणार आहे."
क्रस्ना डायग्नॉस्टीक्सच्या माध्यमातून आम्ही दुर्गम आणि वंचित भागात दर्जात्मक आणि अचूक निदान पोचविल्याचे जैन यांनी सांगितले.
---
तज्ज्ञ म्हणाले
- नेतृत्व विकास केवळ ज्ञान आणि कौशल्याशी निगडित नाही तर तो चौकटीबाहेरील संशोधनाचा भाग आहे
- आंतरराष्ट्रीय कंपन्या आता विकसनशील देशांच्या बाजारपेठेकडे आकर्षित झाल्या आहेत
- जगाच्या जीडीपीमध्ये दोन तृतीयांश विकसनशील देशांचा वाटा
- भारतासह बहुतेक विकसनशील देशांत सध्या स्टार्टअप फीवर
-----

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

खरातशी संबंधित मालमत्ता बड्या अधिकाऱ्यांच्या कुटुंबियांच्या नावे, ईडीचा ससेमिरा मागे लागणार; सरकारी बाबूंचे धाबे दणाणले

US-Iran War: ''रात्रीतून सगळं संपेल...'' इराणसोबतच्या बैठकीवरुन अमेरिकेचं मोठं विधान

Chhatrapati Sambhajinagar: भामट्यांनी दोन दिवसांत हिसकावले तिघींचे मंगळसूत्र; सांगा, रात्री घराबाहेर जाणे टाळावे का?

Chhatrapati Sambhajinagar: उभ्या ट्रकला आयशर धडकला; वडोद बाजार फाट्यावरील घटना; चालक गंभीर जखमी

महाराष्ट्राला उष्णतेच्या लाटेचा इशारा, अकोला जगात सर्वात उष्ण शहर, टॉप १५ मध्ये राज्यातली पाच शहरं

SCROLL FOR NEXT