पुणे

कोंढव्यात एमएनजीएल गॅस वाहिनीला आग

CD

पुणे, ता. २८ : कोंढवा खुर्द परिसरात पारगे नगर येथील रस्त्यावरील ‘एमएनजीएल’ गॅसची पाइपलाइन फुटल्याने भीषण आग लागल्याची घटना मंगळवारी दुपारी घडली. या घटनेत कोणी जखमी झाले नसल्याची माहिती अग्निशमन दलाच्या सूत्रांनी दिली.
या रस्त्यावर जेसीबीच्या साह्याने खोदकाम सुरू होते. त्यावेळी ‘एमएनजीएल’ लाईन फुटल्याने मोठ्या प्रमाणात आग लागली. अग्निशामक दलाच्या जवानांनी आगीवर पाण्याचा मारा सुरू ठेवत ‘एमएनजीएल’च्या अधिकाऱ्यांशी नियंत्रण कक्षामार्फत संपर्क साधला. त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत ‘एमएनजीएल’च्या मुख्य वाहिनीचा प्रवाह बंद केला. अग्निशामक दलाच्या जवानांनी सुमारे तीस मिनिटांत आग आटोक्यात आणली. त्यामुळे पुढील अनर्थ टाळला.
अग्निशामन अधिकारी कैलास शिंदे, वाहनचालक योगेश जगताप, फारुक शेख, अनिल खरात, तांडेल सोपान कांबळे, जवान अभिजित थळकर, अर्जुन यादव, महेश फडतरे, संदीप पवार, अभिषेक कसबे, दिनेश डगळे, प्रसाद शिंदे, संदीप कवडे यांनी आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मुलासह कुटुंब संपवेन! व्हिडीओ कॉलवर कपडे काढायला लावले; ४३ वर्षीय महिलेचा VIDEO केला व्हायरल; २३ ते २८ वर्षांच्या तिघांना अटक

Pune Crime : कारागृहातूनही आंदेकर टोळी सक्रिय; पुणे पोलिस आयुक्तांचे कारागृह प्रशासनाला कडक निर्बंधांचे पत्र

America-Pakistan Relations: 'शांतिदूत' बनलेल्या पाकिस्तानला अमेरिकेचा दणका; ट्रम्प यांचा 'तो' प्रस्ताव ऐकून शहबाज यांना शब्द फुटेना

NEET paper leak: मनीषा हवालदार 'एनटीए'मध्ये अनुवादक म्हणून होती कार्यरत; पेपर कसा फोडला? तपासात झालं उघड

Panshet Tragedy: पानशेत धरणात कोंढव्यातील २२ वर्षीय तरुणाचा बुडून मृत्यू; मित्रांसमोर घडली दुर्दैवी घटना

SCROLL FOR NEXT