Lok Sabha Election ncp candidate list ready jayant patil Sakal
पुणे

Lok Sabha Election : ‘राष्ट्रवादी’च्या उमेदवारांची यादी तयार; जागा वाटपानंतर जाहीर करणार - जयंत पाटील

‘‘आगामी लोकसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या उमेदवारांची यादी तयार आहे.

सकाळ वृत्तसेवा

पुणे : ‘‘आगामी लोकसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या उमेदवारांची यादी तयार आहे. परंतू, महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्षांचे जागावाटप निश्चित होत नाही, तोपर्यंत ही यादी जाहीर केली जाणार नसल्याचे,’’ प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आज (ता.१०) पुणे येथे पत्रकारांशी बोलताना सांगितले.

मांजरी येथील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये (व्हीएसआय) संस्थेच्या नियामक मंडळाची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते. पाटील म्हणाले, ‘‘राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या उमेदवारांच्या यादीबाबत काहीच अडचण नाही. जागावाटपाबाबत चर्चाही चांगली झाली आहे.

‘वंचित’ने प्रस्ताव घेतला असून, तो त्यांच्या कार्यकारिणीसमोर मांडला आहे. वंचित बहुजन विकास आघाडीचे प्रकाश आंबेडकर हे महाविकास आघाडीसोबत येतील, असा विश्वास आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी देशात आणि राज्यात राजकारण केले आहे.

ते नेहमीच जनतेच्या मनातील लोकांना पक्षात घेतात आणि निवडून आणून मोळी बांधतात. ज्यांना मोळी बांधता आली नाही, त्यांच्यावर काय बोलणार,’’ असे म्हणत त्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे नाव न घेता अप्रत्यक्ष टोला लगावला.

जयंत पाटील म्हणाले

- महापालिकेच्या कार्यक्रमात खासदार, आमदारांची नावे असायला हवीत
- पुणे महापालिका आयुक्त हे सरकारची चाकरी करतात. कोण्या पक्षाची नाही
- कोल्हापूर सांगली आणि हातकणंगले या जागांवर चर्चा होऊन, योग्य निर्णय होईल
- आपल्या देशात ‘वन नेशन, वन इलेक्शन’ तसे ‘वन नेशन, एक निवडणूक आयुक्त’ असे असेल
- निवडणूक आयुक्तांनी राजीनामा देण्यामागचे कारण देशासमोर यायला हवे

अजित पवार, वळसे पाटलांची बैठकीला दांडी

दरम्यान, वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या (व्हीएसआय) नियामक मंडळाच्या आजच्या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार, आणि राज्याचे सहकार मंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी दांडी मारली. अजित पवार हे या संस्थेचे संचालक तर वळसे-पाटील हे उपाध्यक्ष आहेत. आजच्या बैठकीला जयंत पाटील, विजयसिंह मोहिते-पाटील, राजेश टोपे, बबन शिंदे, विशाल पाटील आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India Squad for WI Series: हार्दिक पांड्या संघाबाहेरच, जसप्रीत बुमराहचेही नाव गायब; ऋतुराज गायकवाडची वापसी, तर एक सप्राईज पॅकेज, जाणून घ्या भन्नाट टीम इंडिया

India Squad for WI Series: रोहित शर्माच्या भविष्याचा फैसला झाला... वेस्ट इंडिजविरुद्ध BCCI ची वन डे, ट्वेंटी-२० संघाची घोषणा

Manoj Jarange Patil: मोठी बातमी! हैदराबाद गॅझेटियरमध्ये नावंसुद्धा सापडली; विखे पाटलांसह शिष्टमंडळ हैदराबादला जाणार?

Vidyadhar Anaskar : राज्य सहकारी बँकेचे ५,७४५ कोटींचे विक्रमी नेटवर्थ; ठेवी कमी करण्याचा निर्णय व्यावसायिक गणितातून

Marathi News Live Updates : गणेशोत्सवानिमित्त भाजपाध्यक्ष नितीन नबीन यांची मोहोळ यांच्या निवासस्थानी भेट

SCROLL FOR NEXT