New Year begins with biopic Anandayatra of purushottam laxman deshpande Sakal
पुणे

Gudi Padwa 2024 : ‘पुलं’च्या जीवनपट आनंदयात्रेने नववर्षाचा प्रारंभ

‘माझे खाद्यजीवन’ आणि ‘माझा शत्रूपक्ष’ यासारखे भन्नाट लेख... ‘तीन पैशाचा तमाशा’ या आगळ्यावेगळ्या नाटकामागील गोष्ट... ‘नाच रे मोरा’, ‘कबीराचे विणतो शेले’ यासारखी गीते... असा पु. ल. देशपांडे यांच्या चतुरस्र कलावैभवाचा पट मंगळवारी (ता. ९) उलगडला.

सकाळ वृत्तसेवा

Pune News : ‘व्यक्ती आणि वल्ली’मधील अजरामर व्यक्तिरेखा... ‘माझे खाद्यजीवन’ आणि ‘माझा शत्रूपक्ष’ यासारखे भन्नाट लेख... ‘तीन पैशाचा तमाशा’ या आगळ्यावेगळ्या नाटकामागील गोष्ट... ‘नाच रे मोरा’, ‘कबीराचे विणतो शेले’ यासारखी गीते... असा पु. ल. देशपांडे यांच्या चतुरस्र कलावैभवाचा पट मंगळवारी (ता. ९) उलगडला.

‘पुलं’च्या बहुआयामी व्यक्तिमत्त्वाच्या पैलूंचे दर्शन घडवणार्‍या या आनंदयात्रेने नववर्षाची प्रसन्न सुरुवात केली. निमित्त होते ‘सकाळ’तर्फे आयोजित ‘नक्षत्रांचे देणे - पु. ल. देशपांडे’ या विशेष कार्यक्रमाचे. गुढीपाडव्यानिमित्त रंगलेल्या या कार्यक्रमाला पुणेकर रसिकांनी भरघोस प्रतिसाद दिला.

गीतकार, संगीतकार, गायक, संवादिनी वादक, नाटककार, कवी, लेखक, विनोदवीर असे सर्वस्पर्शी व्यक्तिमत्व असणार्‍या ‘पुलं’चा जीवनपट या कार्यक्रमात मांडण्यात आला. गीतांचे सादरीकरण, खुमासदार किस्से, अभिवाचन यासह हे सादरीकरण गुंफण्यात आले होते. ‘पुलं’च्या मुलाखतींसह काही नाटकांतील दृश्यांचा समावेश असलेल्या चित्रफितींनी सादरीकरणाची खुमारी अधिकच वाढवली.

लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटी आणि कल्याण जाधव समूह या कार्यक्रमाचे प्रायोजक होते. याप्रसंगी लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेडचे संस्थापक अध्यक्ष किरण ठाकूर आणि विभागीय प्रमुख सुशील जाधव उपस्थित होते.

‘इंडियन मॅजिक आय’ची निर्मिती असलेल्या या कार्यक्रमाचे निर्मितीप्रमुख म्हणून हृषिकेश देशपांडे यांनी काम पाहिले. श्रीरंग गोडबोले यांनी लेखन व दिग्दर्शन केले. अभिनेते आनंद इंगळे, हृषीकेश जोशी, संदीप पाठक यांनी ‘पुलं’च्या काही व्यक्तिरेखा सादर केल्या. तसेच त्यांच्या साहित्यातील काही भागाचे अभिवाचन केले. विभावरी देशपांडे आणि अमित वझे यांनी निवेदन केले.

अशी मिळाली साथ

हृषिकेश कामेरकर, सावनी दातार, अंजली मराठे, विराज जोशी, अभेद अभिषेकी यांनी गीते सादर केली. सचिन इंगळे यांनी संगीत संयोजन केले. सिंथेसायझरवर केदार परांजपे, बासरीवर नीलेश देशपांडे, व्हायोलिनवर रुचिर इंगळे, ऑक्टोपॅडवर अविनाश कुलकर्णी, ढोलकी व पखवाजवर अपूर्व द्रविड आणि तबल्यावर राजेंद्र हसबनीस यांनी साथसंगत केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vinayak Raut : उद्धव ठाकरेंचे निकटवर्तीय राऊतांकडून सुनेचा छळ?, ठाण्यात गुन्हा दाखल; नगरसेवक पतीवर गंभीर आरोप

IND vs ENG, Rankings: भारताचं १६०० दिवसांचं राज्य संपलं! इंग्लंडने मालिका विजयासह टी२० मधील नंबर १ चा ताजही हिसकावला

Shalarth ID Scam : शिक्षकांची फसवणूक करणारा रिपाइं शिक्षक आघाडीचा जिल्हाध्यक्ष गजाआड; 'शालार्थ' घोटाळ्यात नाशिक पोलिसांची मोठी कारवाई, न्यायालयात 11 हजार पानांचं दोषारोपपत्र सादर

Devendra Fadnavis: इतिहासातील सर्वांत मोठी कर्जमाफी; मुख्यमंत्र्यांचा विश्‍वास; बोगस बियाणे विक्रेत्यांवर कारवाई

Latest Marathi News Update : पुणेकरांना दिलासा! पुण्यात तूर्त पाणीकपात नाही,पुढील आठवड्यात निर्णय

SCROLL FOR NEXT