पुणे

कोथरूड, शिवाजीनगरमधील पाणी पुरवठा बंद

CD

पुणे, ता. २९ : खडकवासला येथे झालेल्या अपघातामध्ये विजेच्या खांबाचे नुकसान झाल्याने जॅकवेलला होणारा विद्युत पुरवठा खंडित झाला आहे. त्यामुळे शिवाजीनगर, चतु:श्रृंगी, बाणेर आदी भागांतील पाणी पुरवठा बंद झाला आहे.
आज सकाळी सव्वा अकराच्या सुमारास अपघात झाल्यानंतर विद्युत पुरवठा यंत्रणेमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने पाणी पुरवठा खंडित झाला आहे. महापालिकेतर्फे तातडीने या ठिकाणी दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. दुरुस्तीचे काम पूर्ण होईपर्यंत वारजे जलशुद्धीकरण केंद्राच्या अखत्यारित संपूर्ण कोथरूड परिसर, वारजे माळवाडी परिसर, बाणेर, बालेवाडी, बावधन व पाषाण परिसर, कर्वे रस्ता, चतु:श्रृंगी, औंध, गणेश खिंड, शिवाजीनगर, गोखलेनगर, प्रभात रस्ता इत्यादी भागातील पाणीपुरवठा बंद आहे.
पर्वती जलशुद्धीकरण केंद्र अखत्यारीत सिंहगड रस्ता परिसर, लष्कर जलशुद्धीकरण केंद्र अखत्यारीत रामटेकडी, हडपसर, मुंढवा, वानवडी, संपूर्ण कोंढवा, खराडी, कॅम्प, येरवडा व खडकी येथील पाणीपुरवठा विस्कळित झाला असून कमी दाबाने पुरवठा होण्याची शक्यता आहे तरी नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन महापालिकेतर्फे करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rupali Chakankar Resigns: ''समाजात आपण कुणालातरी गुरु मानत असतो...'' राजीनाम्यानंतर रुपाली चाकणकरांनी दिलं स्पष्टीकरण

Shivajinagar News : नंबरप्लेटवर चिखल फासून होतेय दिशाभूल; महापालिकेचा फलक लावून शहरात बेकायदा राडारोड्याची वाहतूक

Maharashtra Kesari: महाराष्ट्र केसरी कुस्ती थरारक! मल्लांच्या जिद्द, ताकद आणि कौशल्याने मैदान दणाणलं; जखमी सिकंदर शेखचा आक्रमक खेळ

Pimpri News : ‘मेट्रो मार्गिका-३’ चे काम अंतिम टप्प्यात! हिंजवडी मेट्रोची १२ स्थानके मेपर्यंत सुरू करण्याचे उद्दिष्ट; पीएमआरडीए आयुक्तांकडून पाहणी

पहिल्याच सभेत झेडपी अध्यक्ष-उपाध्यक्षांनी घेतला शिक्षणाधिकाऱ्यांचा तास! शिक्षकांना शिस्त लावा, शाळेत थांबण्याची सक्ती करा, शिक्षणाधिकारी म्हणाले...

SCROLL FOR NEXT