पुणे

केरळमध्ये ३१ मे रोजी मॉन्सून होणार दाखल

CD

पुणे, ता. १५ : देशात उन्हाने होरपळणाऱ्या प्रत्येकाला आणि पावसाकडे डोळे लावून बसलेल्या शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. नैर्ऋत्य मोसमी पाऊस यंदा एक दिवस आधीच म्हणजे ३१ मे रोजी केरळमध्ये दाखल होणार आहे.
मॉन्सून देशातील पहिली सलामी केरळमध्ये देतो. सामान्यतः १ जूनला केरळमध्ये मॉन्सून बरसतो. यंदा उन्हाच्या त्रासाने हैराण झालेल्या सर्वांसाठी भारतीय हवामान खात्याने एक दिवस आधीच मॉन्सून केरळमध्ये दाखल होणार असल्याचा अंदाज बुधवारी रात्री दिला आहे. येत्या रविवारपर्यंत (ता. १९) मॉन्सून दक्षिण अंदमानच्या किनाऱ्यावर दाखल होईल, असे यापूर्वीच हवामान खात्याने सांगितले होते. त्यापुढे जाऊन हा अंदाज आता जाहीर केला आहे.
भारतीय हवामान खाते २००५ पासून मॉन्सून केरळमध्ये दाखल होण्याची तारीख जाहीर करीत आहे. त्यासाठी सांख्यिकी पद्धतीचे प्रारूप देशात विकसित केले आहे. त्या आधारावर चार दिवस पुढे-मागे मॉन्सून केरळमध्ये दाखल होईल, असे नमूद केले आहे. हा अंदाज वर्तविण्यासाठी वेगवेगळ्या सहा निकषांचा वापर करण्यात येतो.


मॉन्सून केरळमध्ये दाखल झाल्याची तारीख
वर्ष ............. दाखल .............. अंदाज
२०१९ .......... ८ जून ..................... ६ जून
२०२० .......... १ जून ...................... ५ जून
२०२१ .......... ३ जून .................... ३१ मे
२०२२ .......... २९ मे ..................... २७ मे
२०२३ .......... ८ जून ...................... ४ जून

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mamata Banerjee TMC Resignation : ममता बॅनर्जींना तगडा झटका; अत्यंत विश्वासू चंद्रिमा भट्टाचार्य यांनी तृणमूल पक्ष प्रमुख पदाचा दिला राजीनामा

Mumbai News: रेल्वेचे दावे कोरडे, डबे मात्र ओले! लोकलच्या छतातून पाण्याचा वर्षाव; रेल्वे प्रशासनावर टीकेचा भडिमार

आधी गाडण्याची तयारी केली, नंतर पतीची हत्या; ४५ दिवसांनी पत्नीचं कांड समोर

Latest Marathi Live Update: विकेंडला रायगडला जाणार आहात? देवकुंड, ताम्हाणीसह अनेक पर्यटनस्थळांवर लागू झाले कडक निर्बंध

Malvan Teacher Transfer : मालवणमध्ये 5 दिवसांपासून शाळा बंद! चांगल्या शिक्षकाच्या बदलीने पालक संतापले; 'त्या' शिक्षकाला परत रुजू न केल्यास दाखले काढून घेण्याचा इशारा

SCROLL FOR NEXT