पुणे

उमेदवारांचे अर्ज भरताना धीरज घाटे गैरहजर

CD

पुणे, ता. २८ : विधानसभा निवडणुकीसाठी आज पुणे शहरातील चार विधानसभा मतदारसंघांमध्ये भाजपच्या उमेदवारांनी शक्तिप्रदर्शन करत अर्ज दाखल केले. मात्र यावेळी शहराध्यक्ष धीरज घाटे हे अनुपस्थित असल्याचे दिसून आले. घाटे यांना कसबा मतदारसंघातून उमेदवारी न मिळाल्याने त्यांनी समाज माध्यमावर नाराजी व्यक्त केली होती.
कसबा मतदारसंघातून निवडणूक लढविण्यास घाटे इच्छुक होते. पक्षाने या ठिकाणाहून महापालिकेच्या स्थायी समितीचे माजी अध्यक्ष हेमंत रासने यांना उमेदवारी दिली आहे. मात्र, उमेदवारी न दिल्याने घाटे यांनी समाज माध्यमावर त्यांची भावना व्यक्त करत नाराजी दर्शविलेली होती. त्यावरून राजकीय चर्चेला उधाण आले आहे.
आज शहरात शिवाजीनगर मतदारसंघातून सिद्धार्थ शिरोळे, कॅंटोन्मेंटमधून सुनील कांबळे, पर्वतीतून माधुरी मिसाळ आणि खडकवासल्यामधून भीमराव तापकीर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यासह अन्य पदाधिकारी या उमेदवारांचा अर्ज भरताना उपस्थित होते. मात्र शहराध्यक्ष घाटे हे एकाही ठिकाणी उपस्थित नसल्याने त्यांच्या नाराजीबाबत पक्षांतर्गत चर्चेला उधाण आले आहे. दरम्यान त्यांच्याशी संपर्क साधला असता प्रतिसाद मिळाला नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime: पुण्यात सैराटपेक्षाची भयानक घटना! प्रेमविवाह केल्याचा मनात राग, तिघांनी सलूनचं सेटर लावलं अन् तरुणावर कोयत्याने वार

Pune News: अमली पदार्थ विरोधी पथकाची माेठी कारवाई! 'कोंढवा, बिबवेवाडीतून २७ लाखांची अफू', मेफेड्रोन जप्त; दोघांना अटक

Dhule News: जोडपं गाढ झोपेत असतानाच नियतीनं डाव साधला, सुखी संसार अर्ध्यावरच संपला; धुळ्यातील दुर्दैवी घटना

DY Chandrachud: माजी CJI चंद्रचूड अजूनही सरकारी बंगल्यातच, सर्वोच्च न्यायालयाचे केंद्र सरकारला पत्र, मोठं कारण आलं समोर

परिवहन मंत्र्यांचे आदेश! 'शालेय विद्यार्थ्यांसाठी एसटीच्या फेऱ्या रद्द करू नयेत'; सव्वापाच लाख प्रवासाचे पास वाटप

SCROLL FOR NEXT