पुणे, ता. १३ : शहरीकरणाच्या वाढत्या वेगासोबत धकाधकीच्या जीवनशैलीमुळे स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणे खूप गरजेचे झाले आहे. त्यासाठी मॅरेथॉन हा एक उत्तम पर्याय आहे. हा पर्याय ‘सकाळ’ माध्यमातून उपलब्ध होत आहे. यात पुणेकरांनी जास्त संख्येने सहभाग नोंदवावा, असे आवाहन पुणे महापालिकेचे आयुक्त तसेच प्रशासक डॉ. राजेंद्र भोसले यांनी केले आहे.
बजाज अलियान्झ पुणे हाफ मॅरेथॉनने स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले आहे. या उपक्रमासाठी पुणे महापालिकेने कायमच भरीव योगदान दिले आहे. सुदृढ आरोग्य आणि सुखी आयुष्य जगण्यासाठी ही मॅरेथॉन प्रेरणा देत आली आहे. आरोग्याच्या या आनंदसोहळ्यात पुणेकरांनी सहभागी व्हावे, असे त्यांनी नमूद केले.
‘सकाळ’तर्फे २०१८ पासून या स्पर्धेचे आयोजन केले जाते.अतिशय नेटक्या नियोजनामुळे पुणेकर स्पर्धेला भरभरून प्रतिसाद देतात. अनेक जण दरवर्षी न चुकता सहकुटुंब सहभागी होतात.
डॉ. भोसले म्हणाले, ‘‘पुणेकरांचे आरोग्य चांगले राहावे यासाठी महापालिकेने कायमच पुढाकार घेतला आहे. हॅकेथॉनच्या माध्यमातून व्यायाम करत ‘शहर स्वच्छता’ हा उपक्रम राबविला जातो. त्यामध्ये हजारो पुणेकर सहभागी होतात. तसेच सायकल क्लबच्या माध्यमातून सुदृढ आरोग्यासाठी जनजागृती केली जाते. त्यासही आरोग्यप्रेमी आणि सायकलप्रेमींचा चांगला प्रतिसाद मिळतो. या उपक्रमांप्रमाणे बजाज अलियान्झ पुणे हाफ मॅरेथॉनला महापालिकेने कायमच प्रोत्साहन दिले आहे.’’
---
‘सकाळ’च्या मॅरेथॉनला पुणे महापालिकेचे सहकार्य आहे. या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या पुणेकरांना एक वेगळी ऊर्जा प्राप्त होईल असा मला विश्वास आहे.
- डॉ. राजेंद्र भोसले, आयुक्त, पुणे महापालिका
-----
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.