पुणे

शाळेत निघालेल्या विद्यार्थ्यावर वार

CD

पुणे, ता. २४ : तीन अल्पवयीन मुलांनी शाळेत निघालेल्या विद्यार्थ्यास शिवीगाळ व मारहाण करत डोक्यात धारदार शस्त्राने वार केले. ही घटना मंगळवारी नऱ्हे परिसरात घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नऱ्हे परिसरातील एका शाळेत १५ वर्षीय विद्यार्थी शिक्षण घेत आहे. मंगळवारी सकाळी साडेसहाच्या सुमारास संबंधित विद्यार्थी जाधवर शाळेच्या रस्त्यावरील जैद रद्दी डेपो अँड स्क्रॅप सेंटर येथून जात होता. त्यावेळी तेथून जाणाऱ्या तीन अल्पवयीन मुलांनी विद्यार्थ्याला अडविले आणि धमकाविले. या घटनेने विद्यार्थी घाबरून पळू लागला. त्यावेळी तिघांनी त्यास शिवीगाळ करत मारहाण केली तर एकाने त्याच्या डोक्यावर कठीण वस्तूने मारले.
या घटनेत विद्यार्थी गंभीर जखमी झाला, त्याने मदतीसाठी आरडाओरडा केल्यानंतर काही नागरिक त्याच्या मदतीसाठी धावून गेले. त्यानंतर मारहाण करणारे मुले घटनास्थळावरून पळून गेले. या प्रकरणी तिघांविरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम ११८ (१) आणि बालक संरक्षण अधिनियमांतर्गत कलम ३ (५) नुसार गुन्हा दाखल केला आहे. सिंहगड रस्ता पोलिस तपास करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Farmer Loan Waiver: कर्जमाफीच्या KYC प्रक्रियेला ब्रेक! पोर्टल संथ, शेतकऱ्यांची सेवा केंद्रांवर गर्दी; पोर्टल स्लोमुळे शेतकरी त्रस्त

IND vs ZIM: MY BAD...! ईशान किशनने सोपा रन-आऊट सोडला अन् डोक्यालाच हात लावला; Video Viral

Ayushman Card : मोबाईलवरून घरबसल्या आयुष्मान कार्ड कसे काढायचे? 5 लाखांपर्यंत मोफत उपचार, वाचा अर्जाची स्टेप-बाय-स्टेप माहिती

Kolhapur Crime: सरकारी नोकरी लावतो, आमिष दाखवून ४८ लाखांची फसवणूक; दोघांना अटक, एक फरार

Latest Marathi News Update : दिल्लीला जाणार का? मुख्यमंत्री फडणवीस यांची दिल्लीवारीवर पहिली प्रतिक्रिया

SCROLL FOR NEXT