पुणे

नाशिकच्या सोलर कंपनीतील कर्मचाऱ्यांना पुण्यात मारहाण

CD

पुणे, ता. २४ : पुण्यातील कंपनी सोडून नाशिक येथील कंपनीत नोकरीसाठी गेल्यानंतर पूर्वीच्या कंपनीची माहिती पळविण्याचा आरोप असलेल्या चार कर्मचाऱ्यांना बेदम मारहाण करण्यात आली.
याप्रकरणी संदीप कैलास लवाटे (वय २८, रा. गणेशनगर, ता. मनमाड, नाशिक) यांनी मारहाण करणाऱ्यांविरुद्ध कोथरूड पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. या घटनेत फिर्यादीसह योगेश दुसाने, सचिन केदार व प्रवीण गायकवाड (सर्व रा. नाशिक) हे जखमी झाले आहेत. लवाटे, दुसाने, केदार, गायकवाड हे चौघेजण पुण्यातील लोहिया आयटी पार्क परिसरातील एका कंपनीत नोकरीला होते. मार्च महिन्यात संबंधित कंपनीची नोकरी सोडून ते नाशिक येथील शिवांजली सोलर कंपनीत रुजू झाले.
दरम्यान, संबंधित कर्मचारी हे जुन्या कंपनीचे ग्राहक व माहिती पळवत असल्याचा तक्रार अर्ज १६ जुलैला कोथरूड पोलिस ठाण्यात देण्यात आला होता. त्याविषयी आपली बाजू मांडण्यासाठी संबंधित कर्मचारी २१ जुलैला नाशिक येथून पुण्याला आले होते. त्यांनी कोथरूड पोलिस ठाण्यात जाऊन आपली बाजू मांडत त्यांच्यावरील आरोप खोडून काढले होते. पोलिसांनी मध्यस्थी करून संबंधित प्रकरण मिटविले. त्यानंतर कर्मचारी त्यांच्या मोटारीने नाशिकला परतण्यासाठी निघाले होते. त्यावेळी आनंदनगर मेट्रो स्टेशनजवळ दुचाकीवरून आलेल्या पूर्वीच्या कंपनीच्या काही कर्मचाऱ्यांनी त्यांचा पाठलाग करत त्यांच्या मोटारीला धडक दिली. या घटनेनंतर कर्मचारी मोटारीमधून उतरल्यानंतर आरोपींनी त्यांना अडवून लाथा-बुक्क्यांनी जबर मारहाण केली. या घटनेत चारही जण जखमी झाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ZIM: भारतीय संघाचा वर्ल्ड रेकॉर्ड! T20I क्रिकेटमध्ये आजपर्यंत कोणीच न केलेला पराक्रम करून दाखवला

Govinda Insurance: गोविंदांसाठी आनंदाची बातमी! २ लाख गोविंदांना मिळणार विमा संरक्षण; दहीहंडीपूर्वी राज्य सरकारचा मोठा निर्णय

Nanded News: नांदेड जिल्हा बँक निवडणुकीचा आज देगलूरात फैसला; सहकारातील राजकीय चुरस शिगेला

नव्या मुख्य सचिवांच्या नियुक्तीनंतर प्रशासनात मोठा बदल; २० IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या, जाणून घ्या यादी...

Farmer Loan Waiver List : सिंधुदुर्गातील 307 गावांतील शेतकऱ्यांसाठी खूशखबर! 'कर्जमुक्ती'ची पहिली यादी जाहीर; 6,711 शेतकरी पात्र, 53 कोटींहून अधिक निधी अपेक्षित

SCROLL FOR NEXT