पुणे

देखाव्याला टाळ्या अन शिट्ट्यांची साद! पुण्याच्या मध्यवस्तीत रविवारी गर्दीचा उच्चांक ः सुटीचा लुटला आनंद

CD

पुणे, ता. ३१ : ‘खंडेराया देवराया.. थाटून आलास नळदुर्गाला, घेऊन जाया बानुबया... बानुबया... बानुबया...बानुबया...’ नवजवान मित्रमंडळाच्या खंडोबा-बानू विवाह सोहळा या जिवंत देखाव्यात लागलेलं गाणं अन देखावा पाहण्यासाठी आलेल्या गणेशभक्तांनी त्यावर धरलेला ठेका, सोबत टाळ्या अन शिट्ट्यांची साथ. अशा उत्साही वातावरणात गणेशभक्तांनी गणेश दर्शनासह देखावे पाहण्याचा आनंद रविवारी लुटला.
रविवार हा सुटीचा वार. हाच मुहूर्त साधत मुलांसह पालकांनी, तरुण- तरुणींनी ठिकठिकाणी देखावे पाहण्यासाठी अलोट गर्दी केली होती. शहराच्या मध्यवस्तीत विविध विषयांवरील देखाव्यांची रेलचेल आहे. सदाशिव पेठ, शनिपार, नागनाथ पार, नातूबाग, हिराबाग, टिळक चौक येथे देखाव्यांनी रविवारी गर्दी खेचली होती. कुठे शिवरायांच्या पराक्रमाची गाथा तर कुठे वेगवेगळ्या मंदिराची प्रतिकृती, तर कोठे सामाजिक विषयाला दिलेले प्राधान्य....हे देखावे आपल्या कॅमेऱ्यात कैद करण्यासाठीही अनेकांची धडपड सुरू होती.
गौरीचे आगमन रविवारी झाले. गौरीपूजनामुळे दुपारच्या वेळी शहरात गर्दी तशी कमी दिसून आली. मात्र सायंकाळच्या वेळी ही गर्दी वाढायला सुरवात झाली. बच्चेकंपनींनी पालकांकडे सुटीमुळे रविवारीच गणेश दर्शन व देखावे पाहण्याचा हट्ट धरला होता. त्यामुळे, सायंकाळी व रात्रीच्या वेळी महिला, बालकांची गर्दी वाढली होती. त्यातच पावसाने घेतलेल्या विश्रांतीमुळे गणेशभक्तांच्या उत्साह द्विगुणित झाला होता. सहकुटुंब आणि मित्र-मैत्रिणींसह आलेल्या नागरिकांमुळे मध्यवर्ती भागातील रस्त्यांवर भाविकांचा जणू महासागर लोटल्याचे चित्र होते.

कडेकोट बंदोबस्त
गर्दीचे व्यवस्थापन करण्यासाठी खासकरून दगडूशेठ हलवाई गणपती, बाबू गेनूच्या गणेशदर्शनासाठी गर्दी होती. मात्र, पोलिस व मंडळाचे कार्यकर्ते सातत्याने गर्दीला दिशा दाखवणे व मार्गदर्शन करत होते. त्यामुळे, गणेश भक्तांना शांततेत दर्शन घेता येत होते. शहरातील महत्त्वाचे रस्ते वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आले होते. परंतु, देखावे पाहताना भाविकांना त्रास होऊ नये म्हणून वाहनांना मंडळाचे कार्यकर्ते थांबवून ठेवत होते.
-----
खाद्यपदार्थांवर ताव
गणेश दर्शनासाठी आलेल्या गणेशभक्तांनी देखावे पाहत सोबत खाद्यपदार्थावरही यथेच्छ ताव मारला. खासकरून हातगाडीवरील वडापाव, भजी, सँडविच, भेळ हे खाद्यपदार्थ रस्त्यावर उभे राहून खाल्ले जात होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sanjay Raut Raj Thackeray meeting : संजय राऊत, राज ठाकरेंच्या भेटीला; महापालिका निवडणुकीनंतर ठाकरे बंधूंमध्ये दुरावा?

Junk Food Cancer Myth: जंक फूड सोडलं म्हणजे कॅन्सरचा धोका संपला? डॉक्टरांनी सांगितले धक्कादायक सत्य, काळजी घ्या

Latest Marathi News Live Update : यवतमाळच्या नेर तालुक्यात बिबट्या विहरीत पडला

Viral News: मूळव्याध शस्त्रक्रियेनंतरही सुट्टी नाकारली! अखेर लोको पायलटने अधिकाऱ्यासमोरच काढली पँट; रेल्वेतील धक्कादायक प्रकार

Arjun Tendulkar Marriage: अर्जुन-सानियाचं लग्न! तेंडुलकर कुटुंब सजलं, मेहंदी-संगीत सोहळ्यासाठी सेलिब्रेटिंचीही हजेरी; Video Viral

SCROLL FOR NEXT