पुणे

पुण्यात शनिवारपासून ‘गुरुस्मरणम’

CD

पुणे, ता. २९ : अभिजात भारतीय संगीतातील दिग्गज कलाकारांच्या स्मरण करण्याच्या हेतूने आयोजित ‘गुरुस्मरणम’ या विशेष कार्यक्रम मालिकेचा आरंभ शनिवारपासून (ता. ४) होत आहे. या मालिकेतील पहिल्या कार्यक्रमात ज्येष्ठ सतारवादक उस्ताद शुजात हुसेन खाँ यांच्या नजाकतपूर्ण सतारवादनाची पर्वणी पुणेकरांना मिळणार आहे.
सकाळ माध्यम समूह आणि स्वरझंकार यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित हा कार्यक्रम शनिवारी सायंकाळी ६.३० वाजता बाणेरमधील बंटारा भवनमध्ये होणार आहे. लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप सोसायटी लि. आणि ‘पु. ना. गाडगीळ आणि सन्स’ हे या कार्यक्रमाचे सहयोगी प्रायोजक आहेत.
अभिजात भारतीय संगीताच्या स्वरक्षितीजावर अनेक कलाकारांनी आपल्या अपूर्व योगदानाने अढळस्थान निर्माण केले आहे. कठोर साधनेतून मिळवलेल्या सिद्धीचा अनुभव त्यांनी मागे ठेवलेल्या त्यांच्या ध्वनिमुद्रित स्वरशिल्पातून अनुभवास मिळतो. अशा थोर कलाकारांचे कार्य पुढील पिढीस निश्चितच प्रेरणादायी व मार्गदर्शक ठरत असते, हे लक्षात घेऊन दिग्गजांनी केलेल्या साधनेचा, त्यांच्या सांगीतिक वाटचालीचा, त्यांच्या सांगीतिक विचारांचा व कार्याचा अभ्यासपूर्ण मागोवा घेणे आणि त्यांच्या अनुयायांकडून त्यांची महती जाणून घेणे, हा ‘गुरुस्मरणम’ या विशेष कार्यक्रम मालिकेचा उद्देश आहे.
या मालिकेतील पहिल्या कार्यक्रमाचा प्रारंभ उस्ताद शुजात हुसेन खाँ यांच्या सादरीकरणाने होणार आहे. मुकेश जाधव आणि सपन अंजारिया हे त्यांना तबल्यावर साथसंगत करणार आहेत. ज्येष्ठ तबलावादक पं. विजय घाटे हे त्यांच्याशी संवाद साधणार आहेत. या कार्यक्रमाची तिकिटे bookmyshow.com या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.

हे लक्षात ठेवा
कधी : ४ ऑक्टोबर
केव्हा : सायंकाळी ६.३० वाजता
कुठे : बंटारा भवन, बाणेर
तिकिटे : ‘बुक माय शो’ या संकेतस्थळावर उपलब्ध


‘लोकमान्य’च्या सभासदांसाठी सवलतीत प्रवेशिका
या कार्यक्रमाच्या सशुल्क प्रवेशिका लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटी लि.च्या सभासदांसाठी सवलतीत उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. या सशुल्क प्रवेशिका घेण्यासाठी ९०२२१७३५९७ या क्रमांकावर संपर्क साधावा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sanjay Dina Patil Controversy : खासदार संजय दिना पाटलांची पत्रकारांना जीवे मारण्याची धमकी, पोलिसांसमोरच अर्वाच्य शिव्या

Tax Refund: आता अवघ्या 7 दिवसांत खात्यात जमा होणार टॅक्स रिफंड! पण त्याआधी 'हे' काम करणे आवश्यक

Latest Marathi News Live Update : अमरावतीत काँग्रेसला मोठा धक्का, काँग्रेसचे प्रकाश साबळे यांचा रवी राणांच्या पक्षात पक्षप्रवेश

Inspirational success story : दोन्ही हात नसतानाही नशिबाशी 'दोन हात'; पन्हाळ्याची लेक माऊली आडकूर बनली मुंबई महापालिकेत अधिकारी

Sangli Railway Update : शेतकऱ्यांसाठी गूड न्यूज! कमी खर्चात आणि कमी वेळेत शेतमाल थेट दिल्लीला पोहोचणार! मिरज ते मुंबई 'किसान रेल'चा मार्ग कसा झाला मोकळा?

SCROLL FOR NEXT