पुणे

दुबार मतदारांची नावे जास्त आढळल्यानेमहापालिकेने मागितले आयोगाकडे मार्गदर्शन

CD

दुबार मतदारांबाबत महापालिकेने
आयोगाकडे मागितले मार्गदर्शन

पुणे, ता. ५ : पुणे महापालिकेच्या निवडणुकीसाठी तयार झालेल्या मतदारयादीत तीन लाख दुबार मतदार असल्याचे प्रशासनाने यापूर्वीच जाहीर केले होते. पण प्रारूप मतदार यादी तपासताना दुबार मतदारांची संख्या जास्त असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे अशा मतदारांचे काय करायचे यासाठी महापालिकेने राज्य निवडणूक आयोगाकडे मार्गदर्शन मागितले आहे, अशी माहिती आयुक्त नवल किशोर राम यांनी दिली.
राज्य निवडणूक आयोगाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत राज्यातील अधिकाऱ्यांशी दूरदृश्य प्रणालीद्वारे संवाद साधला. मतदार यादीतील चुकांवर यावेळी चर्चा करण्यात आली. प्रशासनाने शोधलेल्या तीन लाख दुबार नावांव्यतिरिक्त, राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांनी याहून अधिक नावे ओळखल्याचा दावा केला आहे. मतदारयादीत नावांचा समावेश करणे किंवा वगळणे हा अधिकार निवडणूक आयोगाकडे असल्याने आयोगाकडून स्पष्ट मार्गदर्शन आवश्यक आहे.
दुबार मतदारांनी दुबार मतदान होऊ नये, यासाठी जनजागृती करावी लागणार आहे. आत्तापर्यंत २२ हजारांपैकी १२ हजार हरकतींची तपासणी झाली असून उर्वरित हरकतींची कारवाई सात डिसेंबरपर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे, असेही राम यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Putin-Modi Meet: क्रीडा आणि आरोग्यासह अनेक करार... पुतिन आणि मोदींच्या लक्षवेधी प्रतिक्रिया; भेटीत नेमकं काय घडलं? वाचा A टू Z अहवाल

लंडनच्या चौकात दिसणार राज आणि सिमरन! पुतळा अनावरणावेळी भावुक होत किंग खान म्हणाला...'कुणालाच कल्पना नव्हती की'

Kolhapur Plastic Ban : प्लास्टिक बंदी उल्लंघन करणाऱ्यांवर आता दंडासह तीन महिन्यांचा कारावास होणार; महापालिका विशेष मोहिमेस सज्ज

India's Probable Playing XI : रवींद्र जडेजाला डच्चू, भारताच्या अंतिम ११ मध्ये आशिया चषक स्पर्धेतील हिरो परतणार? जाणून घ्या बदल

Fact Check: इंडिगो विमानाजवळ बॅगा टाकून बसलेल्या प्रवाशांचा 'तो' फोटो नेमका कधीचा? व्हायरल फोटोमागचं सत्य काय?

SCROLL FOR NEXT