कोळोगाव धरणात केवळ २१ टक्के पाणी
पांडे ः सोलापूर तसेच धाराशिव जिल्ह्याच्या सरहद्दीवर असणाऱ्या करमाळा तालुक्यातील आवाटीजवळ असणाऱ्या सीना कोळेगाव धरणाच्या पाण्याची पातळी बाष्पीभवनाने दिवसेंदिवस घटत असून, धरणात अवघे २१ टक्के पाणीसाठा राहिला आहे. धरणात शिल्लक राहिलेल्या पाण्याचे योग्य नियोजन करून पाणी वापर करावे, असे आवाहन संबंधित कोळगाव धरणाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी केले आहे. करमाळा तालुक्यातील विशेषतः पूर्व भागातील वरदायिनी ठरलेल्या कोळगाव धरणाचे पाणी कडक उन्हामुळे दिवसेंदिवस कमी होत चालले आहे. धरणात सध्या २१.४८ टक्के पाणी शिल्लक आहे. तापमानातील वाढत्या बदलामुळे पाणी दिवसेंदिवस बाष्पीभवनामुळे कमी होत चालले आहे. करमाळा तालुक्यातील विशेषतः पूर्व भागातील हिसरे, हिवरे, निमगाव कोळगाव आवाटी, नेरले, सालसे, गौंडरे बोरगाव, दिलमेश्वर आदी भागातील शेतकऱ्यांना या धरणाचा मोठा फायदा होतो.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.