पुणे

पराभवाच्या शक्यतेने विलीनीकरणाची भाषा

CD

पिंपरी, ता. १० : ‘‘बारामती मतदारसंघात मतदान झाले आणि शरद पवार यांना कळून चुकले की, आता आपले काही खरे नाही. आता राजकीय हवा महायुती आणि अजित पवार यांच्या बाजूने वाहू लागली आहे. आपला पराभव निश्चित आहे. म्हणून ते प्रादेशिक पक्षांचे काँग्रेसमध्ये विलीनीकरणाची भाषा बोलत आहेत,’’ असा आरोप उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी (ता. १०) भोसरीतील सभेत केला.
महायुतीतील राष्ट्रवादी काँग्रेसचे शिरूर लोकसभा मतदारसंघातील उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या प्रचारार्थ भोसरीत आयोजित सभेत फडणवीस बोलत होते. आढळराव यांच्यासह आमदार महेश लांडगे, अश्विनी जगताप, उमा खापरे, माजी आमदार विलास लांडे, मंगलदास बांदल आदी उपस्थित होते. फडणवीस म्हणाले, ‘‘पंतप्रधानपदी नरेंद्र मोदी पुन्हा विराजमान होतील, तेव्हा शहरातील रेडझोनचा प्रश्न सोडविण्यासाठी संरक्षणमंत्र्यांना प्रसंगी मोदी यांना भेटू आणि सर्व मिळून हा प्रश्न सोडवू. इंद्रायणी नदी प्रदूषणमुक्त करायची आहे. हिंजवडी ते भोसरी-चाकण मेट्रोने जोडणार आहोत. चाकणमधील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी तीन मजली उड्डाण पुलाचे नियोजन आहे. पीएमपीच्या ताफ्यात ई-बसची संख्या वाढवून पर्यावरण पूरक काम करायचे आहे.’’

पंतप्रधानपदासाठी ते संगीत खुर्ची खेळतील
नरेंद्र मोदी आमच्या महायुतीचे पंतप्रधानपदाचे उमेदवार आहेत. इंडिया आघाडीकडे असा नेताच नसल्याने ते संगीत खुर्ची खेळतील आणि पाच वर्षांत पाच पंतप्रधान देतील, अशी टीका करत फडणवीस यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांच्यावरही हल्लाबोल केला. निवडणूक झाल्यानंतर ते नाटके करतात आणि जनतेला विसरतात. ते ‘फ्लॉप’ ठरले आहेत, त्यांना आता पुन्हा संधी द्यायची नाही. कारण ते चांगले कलाकार आहेत. पण, चांगले खासदार होऊ शकले नाहीत, असा टोलाही फडणवीस यांनी लगावला.

आमदार महेश लांडगे म्हणाले...
- महायुतीच्या सरकारमुळे प्राधिकरण बाधित भूमिपुत्रांना साडेबारा टक्के परतावा
- मिळकतकरासोबत कचरा संकलनासंदर्भातील उपयोगिता शुल्क आकारणी रद्द
- पंतप्रधान आवास योजनेतून घरे, पोलिस आयुक्तालय, आंद्रा, भामा-आसखेड पाणी योजना सुरू
- पिंपरी-चिंचवडमधील सर्व प्रश्न सुटलेत, फक्त रेड झोनचा प्रश्न मार्गी लावावा

आढळराव पाटील म्हणाले
- मतदारसंघासाठी आलेला निधी खर्च न करणारा खासदार आपण पाच वर्षे पाहिला
- आमच्यासाठी काय केले, असे लोक महाविकास आघाडीच्या उमेदवाराला विचारताहेत
- विकासाबाबत सांगण्यासारखे एकही काम त्यांनी केलेले नाही
- गेली वीस वर्षे धनुष्यबाणाशी एकनिष्ठ राहिलो, आता महायुतीचा जागा वाटपाचा निर्णय म्हणून घड्याळाच्या चिन्हावर लढतोय
...
फोटो आय डी १९००४

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asia Cup 2026 Final: भारतीय संघ आठव्यांदा चॅम्पियन! फायनलमध्ये श्रीलंकेला पराभूत करत जिंकले विजतेपद

IND vs AFG, 1st T20I: ७ सिक्स अन् ७ फोर... अभिषेक शर्माचं वादळ घोंगावलं, पण शतक हुकलं! भारताचा १४ ओव्हरमध्येच दणदणीत विजय

Pune Navale Bridge : पुण्यातील नवले पुलाजवळ अभिनेत्रीसोबत धक्कादायक प्रकार; आधी गाडीला धडक अन् मग हात ओढून पळवून नेण्याचा प्रयत्न

Railway Accident: रेल्वे गेट ९६ जवळ स्विफ्ट गाडी २० फूट खड्ड्यात कोसळली; तीन पलट्यांनंतरही एअरबॅगमुळे पाच जणांचे प्राण वाचले

Asia Cup Final: स्मृती मानधना - शफली वर्माचे तब्बल तीन वर्ल्ड रेकॉर्ड! भारताचे श्रीलंकेसमोर भलंमोठं लक्ष्य

SCROLL FOR NEXT