पुणे

वाढणार विकासकामांची गती!

CD

सकाळ वृत्तसेवा
पुणे, ता. ३० : पुणे महानगर क्षेत्र प्राधिकरणाच्या (पीएमआरडी) हद्दीत पंधरा कोटी रुपयांच्या विकास कामांच्या निविदा मंजूर करण्याचे अधिकार आयुक्तांना देण्याचा निर्णय कार्यकारी समितीच्या बैठकीत सोमवारी घेण्यात आला. त्याबरोबरच ‘पीएमआरडीए’च्या ४०७ पदांच्या आकृतीबंधास देखील या समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. या निर्णयामुळे ‘पीएमआरडी’च्या स्तरावर काही प्रमाणात तरी विकास कामे मार्गी लागण्यास मदत होणार आहे.
राज्य सरकारच्या वित्त विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव मनोज सैनिक यांच्या अध्यक्षतेखाली ‘पीएमआरडीए’च्या कार्यकारी समितीची सोमवारी मुंबईत बैठक झाली. या बैठकीला ‘पीएमआरडीए’चे आयुक्त राहुल महिवाल यांच्यासह नगर विकास, गृहनिर्माण विभाग, दोन्ही महापालिका आयुक्त यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

पूर्वी काय होत होते?
- यापूर्वी ‘पीएमआरडीए’च्या आयुक्तांना १२ कोटी ५० लाख रुपयांपर्यंतच्या निविदांना स्वतःच्या स्तरावर मान्यता देण्याचे अधिकार होते
- त्यापुढील रकमेच्या निविदांना मंजुरीसाठी कार्यकारी समितीकडे मान्यतेसाठी जावे लागत होते
- त्यामुळे विकास कामांना विलंब होत होता

बैठकीत काय झाले?
- ‘एमएमआरडीए’च्या धर्तीवर १५ कोटी रुपयांपर्यंतच्या विकास कामांचे अधिकारी आयुक्तांना द्यावेत, असा प्रस्ताव ‘पीएमआरडीए’कडून मांडण्यात आला
- त्यावर चर्चा होऊन ‘एमएमआरडी’च्या आयुक्तांना असलेल्या अधिकाऱ्यांच्या ६० टक्के रकमेपर्यंतच्या निविदांना आयुक्तांच्या स्तरावर मान्यता देण्यास मंजुरी

काय फायदा होणार?
- या निर्णयामुळे आयुक्तांना आता १५ कोटी रुपयांपर्यंतच्या निविदांना मान्यता देण्याचे अधिकार
- ‘पीएमआरडीए’कडून कार्यक्षेत्रात विविध विकास कामे प्रस्तावित
- त्याचबरोबरच म्हाळुंगे-माण टीपी स्किम देखील स्वखर्चाने राबविण्याचा निर्णय
- आयुक्तांच्या अधिकारात वाढ करण्यात आल्याने त्यांचा फायदा या योजनेतील छोटी व आवश्‍यक कामे मार्गी लागण्यास मदत

४०७ पदांच्या आकृतीबंदास मान्यता
‘पीएमआरडीए’मध्ये विविध ४०७ पदांच्या आकृतीबंदास मान्यता देण्याचा प्रस्तावही या बैठकीत चर्चेला आला होता. त्यास समितीकडून मान्यता देण्यात आली आहे. त्यामुळे या पदांची भरती करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. तर भूखंडांच्या लिलावासंदर्भातील प्रस्तावावर विधी व न्याय विभागाचा अभिप्राय घ्यावा, त्यानंतरच त्यावर निर्णय घेण्याचे या बैठकीत ठरले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Marathi News : युवराज सिंग SRH मालकीण काव्या मारनवर नाराज; म्हणाला, अभिषेक शर्माने फ्रँचायझीसाठी ७ वर्ष घासली...

Latest Marathi News Live Update : पुणे शहरातील अनेक प्रमुख रस्ते पाण्याखाली

IPL 2026 : RCB च्या गोलंदाजाने क्रिकेट बोर्डाला न्यायालयात खेचले, ९ एप्रिलला निकाल; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

Rawdogging Boredom: 'काहीही न करता बसणं' बनलं ट्रेंड! Gen Z चा "Rawdogging Boredom" फंडा आहे तरी काय?

IPL 2026: 'तो' ड्रेसिंग रूममधून पळत आला, डेव्हिड मिलरला फलंदाजीला जाण्यास रोखले अन्... DC च्या डग आऊटमधील Video Viral

SCROLL FOR NEXT