पुणे

उषा काकडे यांचे नाव गुन्ह्यातून वगळण्याच्या निर्णयास स्थगिती

CD

उषा काकडे यांचे नाव गुन्ह्यातून
वगळण्याच्या निर्णयास स्थगिती

पुणे, ता. ३० : भावाला गोळ्या घालून ठार मारण्याची धमकी दिल्याप्रकरणात माजी खासदार संजय काकडे यांच्या पत्नी उषा काकडे यांचे नाव गुन्ह्यातून वगळण्याच्या आदेशास उच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे.
न्यायमूर्ती आर. जी. अवचट यांनी सोमवारी (ता. ३०) हा आदेश दिला. सत्र न्यायालयाने काही दिवसांपूर्वी उषा काकडे यांचे नाव या गुन्ह्यातून वगळण्याचा आदेश दिला होता. या प्रकरणी काकडे यांचे बंधू युवराज सीताराम ढमाले (वय ४०) यांनी चतु:श्रृंगी पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. त्यानुसार काकडे दांपत्याविरोधात विविध कलमांनुसार गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यात काकडे दांपत्याविरुद्ध दोषारोपपत्र दाखल झाल्यानंतर उषा काकडे यांनी गुन्ह्यातून नाव वगळण्यासाठी येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयात अर्ज केला होता. हा अर्ज न्यायालयाने फेटाळल्यानंतर काकडे यांनी सत्र न्यायालयात धाव घेतली होती. सत्र न्यायालयाने काकडे यांचा अर्ज मंजूर केला होता. त्यामुळे या आदेशाविरुद्ध फिर्यादी ढमाले यांनी त्यांच्या वकिलांमार्फत उच्च न्यायालयात अपील केले होते. फिर्यादीतर्फे ॲड. आबाद कोंडा, ॲड. सत्यव्रत जोशी, ॲड. नीलेश त्रिभुवन आणि ॲड. विजयसिंह ठोंबरे यांनी कामकाज पाहिले. या प्रकरणाची पुढील सुनावणी २७ फेब्रुवारीला होणार आहे. दरम्यान याबाबत काकडे दांपत्याची बाजू समजून घेण्यासाठी संपर्क केला असता तो होऊ शकला नाही.

बाजू मांडण्याची संधी न देता अर्ज मंजूर केला
फिर्यादी यांना नोटीस न बजावता, त्यांची बाजू मांडण्याची संधी न देता सत्र न्यायालयाने उषा काकडे यांचा अर्ज मंजूर केला होता. त्यामुळे नाव वगळण्याच्या निर्णयास स्थगिती द्यावी, असा युक्तिवाद करण्यात आल्याची माहिती ॲड. ठोंबरे यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime: पुण्यात सैराटपेक्षाची भयानक घटना! प्रेमविवाह केल्याचा मनात राग, तिघांनी सलूनचं सेटर लावलं अन् तरुणावर कोयत्याने वार

Pune News: अमली पदार्थ विरोधी पथकाची माेठी कारवाई! 'कोंढवा, बिबवेवाडीतून २७ लाखांची अफू', मेफेड्रोन जप्त; दोघांना अटक

Dhule News: जोडपं गाढ झोपेत असतानाच नियतीनं डाव साधला, सुखी संसार अर्ध्यावरच संपला; धुळ्यातील दुर्दैवी घटना

DY Chandrachud: माजी CJI चंद्रचूड अजूनही सरकारी बंगल्यातच, सर्वोच्च न्यायालयाचे केंद्र सरकारला पत्र, मोठं कारण आलं समोर

परिवहन मंत्र्यांचे आदेश! 'शालेय विद्यार्थ्यांसाठी एसटीच्या फेऱ्या रद्द करू नयेत'; सव्वापाच लाख प्रवासाचे पास वाटप

SCROLL FOR NEXT