पुणे

कार्तिकेय गणेशन यांना अवचट स्मृती सन्मान

CD

पुणे, ता. २ : मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्राच्या संस्थापक डॉ. अनिता अवचट यांच्या स्मृतीप्रित्यर्थ दरवर्षी देण्यात येणारा डॉ. अनिता अवचट स्मृती संघर्ष सन्मान पुरस्कार यंदा चेन्नई येथील सृष्टी फाउंडेशनचे कार्तिकेय गणेशन यांना, तर डॉ. अनिल अवचट यांच्या पहिल्या स्मृतिदिनानिमित्त यावर्षीपासून देण्यात येणारा डॉ. अनिल अवचट स्मृती सृजन सन्मान पुरस्कार मिरज येथील भारतीय तंतुवाद्य केंद्राला देण्यात येणार आहे, अशी माहिती मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्राच्या संचालक डॉ. मुक्ता पुणतांबेकर यांनी दिली.
प्रत्येकी वीस हजार रुपये आणि स्मृतिचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. पुरस्काराचे वितरण संशोधक अरविंद गुप्ता यांच्या अध्यक्षतेखाली येत्या रविवारी (ता. ५) कोथरूड येथील एम. ई. एस बालशिक्षण मंदिर सभागृहात सकाळी अकरा वाजता होणार आहे. याप्रसंगी डॉ. आनंद नाडकर्णी पुरस्कार विजेत्यांशी संवाद साधणार आहेत.
कार्तिकेय गणेशन यांनी वैयक्तिक आयुष्यात विविध संघर्षांना सामोरे जात दिव्यांगांसाठी आशेचा किरण बनून प्रतिभाशाली परंतु दुर्लक्षित अशा या माणसांसाठी सृष्टी फाउंडेशनची स्थापना केली आहे. या फाउंडेशनमार्फत कौशल्याधारित शिक्षणाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. तर पहिल्याच डॉ. अनिल अवचट स्मृती सृजन सन्मान पुरस्काराचे मानकरी ठरलेल्या भारतीय तंतुवाद्य केंद्राने भारतीय शास्त्रीय संगीताचा अविभाज्य घटक असलेल्या तंतुवाद्यांच्या निर्मितीची परंपरा जपली आहे. याबद्दल केंद्राचे नौशाद गुलाबसाहेब यांना सन्मानित करण्यात येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ZIM, T20 WC: ८ चेंडूंत ४० धावा! अभिषेक शर्माची फिफ्टी, सूर्याला 'स्वच्छ भारत'चा सदिच्छादूत बनवण्याची गावस्करांची मागणी

Khamgaon Crime : सख्ख्या भावाचा खून करून मृतदेह जाळला व राख फेकली नदीत; राहुड येथील घटना, दोन्ही आरोपीस अटक

Latest Marathi News Live Update : ‘शाळा दत्तक धोरणा’वरून पालिका सभेत जोरदार खडाजंगी

Murud News : विद्युत पोलवर काम करताना तरुणाचा मृत्यू; आर्थिक मदतीसाठी नातेवाईकांचा रास्ता रोको

Parth Pawar to Join Rajya Sabha: पार्थ पवार राज्यसभेवर जाणार! राष्ट्रवादीच्या बैठकीत प्रफुल पटेल यांनी केली घोषणा

SCROLL FOR NEXT