पुणे

यकृताच्या कर्करोगावर ‘रसायू थेरपी’ची मात्रा

CD

पुणे, ता. ३ : यकृताच्या कर्करोगावर आयुर्वेदातील रसायन थेरपीचा डोस रामबाण ठरत असल्याचे यशस्वी संशोधन पुण्यात झाले. या संशोधनातील निष्कर्ष ‘युरोपियन आणि जापनीज सोसायटी ऑफ मेडिकल ऑन्कॉलॉजी’च्या सभेत सादर करण्यासाठी स्वीकारले आहेत.

आशेचा नवा किरण
आधुनिक काळातील चुकीची जीवनशैली, तसेच खाण्या-पिण्याच्या सवयीचा थेट परिणाम यकृतावर होतो. हिपॅटायटीस ‘बी’ आणि ‘सी’ सारख्या आजारांबरोबरच दारू पिण्याने अथवा इतर कारणाने होणारा ‘लिव्हर सिरॉसिस’मुळे यकृताचे कार्य बिघडते. याची चिकित्सा सुरू असतानाही कर्करोग उद्भवण्याची दाट शक्यता असते. अशा रुग्णांचे जीवनमान सुधारण्यासाठी आयुर्वेदातील रसायन चिकित्सेच्या माध्यमातून आशेचा नवा किरण दिसल्याचा विश्वास व्यक्त केला. त्यासाठी रसायू कॅन्सर क्लिनिकमधील आयुर्वेदिक वैद्यांनी जागतिक पातळीवर शास्त्रीय कसोटीवर संशोधन केले. वैद्य अविनाश कदम, वैद्य पूनम गवांदे, वैद्य आनंद पाटील, वैद्य हर्शल जगताप- पाटील आणि वैद्य प्रवीण गुंड यात सहभागी होते.

असे केले संशोधन
- कर्करोग चौथ्या टप्प्यात असलेल्या रुग्णांची दोन गटात वर्गवारी
- केवळ रसायन थेरपी घेतलेले रुग्ण पहिल्या गटात, तर रसायन थेरपीसोबत प्रमाणित उपचार घेतलेल्या रुग्णांचा दुसरा गट
- रुग्णांच्या आरोग्याची सर्वंकष माहिती संकलित करून आंतरराष्ट्रीय पातळीवर निकषांप्रमाणे विश्लेषण
- संशोधनात सहभागी रुग्णांना आयुर्वेदाच्या तत्त्वानुसार औषधी वनस्पती व खनिजांवर जैविक प्रक्रिया करून उत्पादित रसायन औषधे दिली
- औषधामुळे शरीरक्रीयेत आणि पेशीस्तरावर होणारे सूक्ष्मबदल टिपले

संशोधनाचा उद्देश काय?
- यकृताचा कर्करोग झालेल्या रुग्णांवर सध्या उपलब्ध चिकित्सेत मर्यादा असल्याने आयुर्वेदीय दृष्टीने या रूग्णांकरिता काही नवीन उपचार पद्धती विकसित करता येऊ शकेल का, याचा अभ्यास करणे.
- रुग्णांचे आयुष्यमान तर वाढेल; तसेच यांच्या आयुष्याचा दर्जाही सुधारणे.
- रसायन थेरपीची यकृताच्या कर्करोगाच्या रुग्णांवरील परिणामकारकता शास्त्रीय पद्धतीने तपासणे. त्यासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवर संशोधनासाठी वापरण्यात येणाऱ्या निकषांचा आधार घेण्यात आला.

निष्कर्ष -
- रसायन चिकित्सा रुग्णासाठी नवी चिकित्सा पद्धत उदयास येऊ शकते. वेगवेगळ्या कारणांमुळे इतर उपचार घेऊ शकत नाही, अशा रुग्णांसाठी उपयुक्त ठरेल.

संशोधनावर आंतरराष्ट्रीय मोहोर
यकृताच्या कर्करोगाच्या चौथ्या टप्प्यातील रुग्णचिकित्सेवर या संशोधनामुळे आंतरराष्ट्रीय मोहोर उमटली आहे. पुढील संशोधनाची दिशा- आयुर्वेदाच्या मूळ तत्त्वानुसार वर उल्लेखलेल्या यकृताच्या इतर व्याधींचे कर्करोगांमध्ये परिवर्तन होऊ नये, याकरिता प्राथमिक प्रतिबंध करणे.

रसायू थेरपी ही रोग किंवा औषधकेंद्रीत नसून रुग्णकेंद्रीत उपचार पद्धती आहे. तोंडावाटे हे औषध रुग्णाला दिले जाते. त्यासाठी रुग्णाला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्याची आवश्यकता नसते. अत्यंत सुरक्षित अशा या चिकित्सेने कर्करोगाच्या रुग्णांचे जीवनमान सुधारण्याची क्षमता आयुर्वेदात असल्याचे आधुनिक जागतिक निकषांवर सिद्ध झाले. हे संशोधन आयुर्वेद शास्त्राला पुराव्यावर आधारित जागतिक ओळख मिळवून देण्यास निश्चित उपयुक्त ठरेल.
- वैद्य योगेश बेंडाळे,
रसायू कॅन्सर क्लिनिक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BLO clarifies Rahul Gandhi's claim : ''होय! एका पत्त्यावर ८० मतदारांची नोंदणी पण...''; राहुल गांधींच्या आरोपांवर महादेवपुराच्या BLO चं स्पष्टीकरण, नेमकं काय म्हणाले?

Rakhi Price Hike Viral Video : राखी खरेदीआधी एकदा हा व्हिडिओ नक्की बघा; काही सेकंदातच दोन रुपयांची राखी झाली ५० रुपयांना!

Mumbai Crime: मुंबईत प्रियकरासोबत लॉजवर गेली, शरीरसंबंध ठेवताना गुप्तांगाला दुखापत; सत्य लपवण्यासाठी तरुणीचा भलताच कारनामा

Numerology 2025 : 'या' जन्मतारखेवर जन्मलेल्या मुली असतात जोडीदारासाठी लकी ! लग्नानंतर उजळतं जोडीदाराचं भाग्य

Pune News: बारामतीत हुतात्मा स्तंभाचे स्थलांतर करण्यास स्वातंत्र्यसैनिक संघटनेचा विरोध

SCROLL FOR NEXT