पुणे

रिअल इस्टेट एजंट प्रशिक्षणाचा उद्या विनामूल्य वेबिनार

CD

पुणे, ता. ७ : ‘महारेरा’ने आता रिअल इस्टेट एजंटना व्यवसाय करण्यासाठी प्रमाणपत्र बाळगणे बंधनकारक केले आहे. हे प्रमाणपत्र मिळवण्यासाठी त्यासाठीचे प्रशिक्षण पूर्ण करणे आवश्यक आहे ‘सकाळ’ व ‘ॲग्रोवन’ संलग्न शैक्षणिक संस्था ‘एसआयआयएलसी’ला या प्रशिक्षणासाठी महारेराकडून अधिकृत प्रशिक्षण संस्था म्हणून मान्यता मिळाली आहे. ऑनलाइन लाइव्ह पद्धतीने २० तासांचे हे प्रशिक्षण पूर्ण करून एजंटला प्रमाणपत्र प्राप्त करून घेता येईल. नव्याने एजंटचे रजिस्ट्रेशन करताना किंवा रजिस्ट्रेशनचे नूतनीकरण करताना हे प्रमाणपत्र आता बंधनकारक आहे. महारेराने ठरवून दिलेल्या अभ्यासक्रमाव्यतिरिक्त डिजिटल मार्केटिंग, वास्तुशास्त्र या विषयांच्या कार्यशाळा या प्रशिक्षणात होणार आहेत. प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या एजंटना ‘सकाळ’मधील जाहिरातींमध्ये सवलत (अटी आणि शर्तींसह*) मिळणार आहे.
यासंदर्भात अधिक माहिती देणारा विनामूल्य वेबिनार गुरुवारी (ता. ९) दुपारी १२ वाजता आयोजिला आहे.
अधिक माहितीसाठी संपर्क : ९१३००७०१३२, ७३५०००१६०३

लोगो- एसआयआयएलसी
मशरूम उत्पादन तंत्राविषयी मार्गदर्शन
पुणे, ता. ७ : मशरूम अर्थात अळिंबीमध्ये भरपूर पोषक गुणधर्म असूनही त्याविषयी पुरेशी जागरूकता नसल्याने दररोजच्या खाण्यात वापर कमी होतो. परंतु हॉटेल इंडस्ट्री तसेच वेगवेगळ्या प्रकारच्या डिशेसमध्ये ओयिस्टर, बटन तसेच मिल्की मशरूमचा वापर मोठ्या प्रमाणात होत असल्याने मागणी वाढत आहे. याशिवाय हा व्यवसाय छोट्या जागेत, कमी भांडवलात सुरू करणे शक्‍य असल्याने कोणीही हा व्यवसाय करू शकतो. याविषयी सखोल माहिती देणारे प्रात्यक्षिकावर आधारित प्रशिक्षण शनिवारी (ता. ११) व रविवारी (ता. १२) आयोजिले आहे. यामध्ये मशरूम उत्पादन पद्धती, स्पॉन उत्पादन, गुंतवणूक, मार्केट आदींबाबत प्रशिक्षण तसेच स्पॉन व मशरूम उत्पादनाचे प्रात्यक्षिक दाखवण्यात येईल. जेवण व प्रमाणपत्रासह प्रतिव्यक्ती शुल्क ३७५० रुपये.
प्रशिक्षण ठिकाण ः सकाळ मीडिया सेंटर, सकाळनगर, गेट नं.१, बाणेर रोड, औंध, पुणे
नावनोंदणीसाठी संपर्क : ९१४६०३८०३१

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Jarange Patil : डोकेदुखी वाढणार?अंतरवालीतील महिलेचा पोलिसांत मोठा दावा,प्रकरण काय?

India Selection Committee: रोहित शर्माचा जवळचा मित्र घेणार अजित आगरकरची जागा? गुवाहाटीतील मिटिंगमधील अनुपस्थितीने चर्चेला उधाण

मुलाचं Instagram अकाउंट पालकांना थेट पाहता येतं का? Metaचे नियम काय?

Gyanesh Kumar : ज्ञानेश कुमार यांना राजीनामा द्यावा लागणार का?

Latest Marathi News Live Update : पुणे शिक्षक मतदारसंघाच्या मतदार यादीवर प्रश्नचिन्ह; सचिन सानप यांची हायकोर्टात धाव

SCROLL FOR NEXT