पुणे

स्वरस्वती मैफलीतून अनोखी मानवंदना

CD

पुणे, ता. ८ ः गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त सलग सहा तास गायन करत त्यांना अनोखी मानवंदना देण्यात आली. महक प्रस्तुत ‘स्वरस्वती’ या मैफलीतून अजरामर गीतांचा नजराणा पुणेकरांनी अनुभवला.
यावेळी गायिका मनीषा निश्चल यांच्यासह स्वप्नजा लेले, अंजली मराठे, जितेंद्र अभ्यंकर, गफार मोमीन यांनी बहारदार हिंदी व मराठी गीते सादर केली. ‘गगन सदन’ या गीताने मैफलीला प्रारंभ झाला. त्यानंतर ‘ऐरणीच्या देवा तुला’, ‘भय इथले संपत नाही’, ‘वारा गाई गाणे’, ‘आज गोकुळात रंग खेळतो’, अशा लोकप्रिय गाण्यांनी श्रोत्यांना ठेका धरायला लावला. ‘अजीब दास्तान’, ‘होठों में ऐसी बात’, ‘गाता रहे मेरा दिल’ या हिंदी गीतांनी मैफिलीत रंग भरले. ‘चलते चलते यूँ ही कोई’ या गीताने कार्यक्रमाची सांगता झाली.
गीतांच्या सादरीकरणासोबतच शिल्पकार सुरेश राऊत यांनी प्रत्यक्ष साकारलेले लता दीदींचे शिल्प रसिकांचे लक्ष वेधून घेत होते. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी, प्रसिद्ध अभिनेते अमिताभ बच्चन, हेमामालिनी, पं. हृदयनाथ मंगेशकर आदींनी लता दीदींबद्दल व्यक्त केलेल्या भावनांच्या गफार मोमीन यांनी संकलित केलेल्या ध्वनिचित्रफिती दाखवण्यात आल्या.
.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime News : पुण्यात थरार ! उत्तराखंडच्या 'त्या' तरुणाने पीएमपीएमएल बस का पळवली ? तपासात खळबळजनक माहिती समोर

Latest Marathi News Live Update : विदर्भात सूर्य आग ओकतोय, वर्ध्यात पारा 46 अंशांवर

Gold Rate Today: आठवड्याच्या सुरुवातीलाच सोन्याच्या भावात मोठा बदल! 1 तोळ्याचा ताजा दर किती? खरेदीदारांनी काय करावे?

Chhatrapati Sambhajinagar: उष्णतेच्या लाटेत आपल्‍या पशुधनाची घ्या काळजी; सोयगाव पशुसंवर्धन विभाग सतर्क, ‘एल निनो’च्या प्रभावाने तापमानाचा वाढला पारा

Mumbai : मरीन ड्राइव्हवर भीषण अपघात, २ दुचाकींची धडक; वृद्धासह तरुण-तरुणीचा मृत्यू

SCROLL FOR NEXT