पुणे

आजी-माजी आमदारांवर प्रभागांची जबाबदारी

CD

पुणे, ता. ७ ः कसबा विधानसभा मतदारसंघ पोटनिवडणुकीसाठी भाजपने या मतदारसंघात एक प्रभाग एक आमदार किंवा माजी आमदार अशी रचना लावली आहे. तसेच बूथ यंत्रणा, प्रचार यंत्रणा उभारण्याची जबाबदारी यांच्याकडे देण्यात आली आहे.
कसबा विधानसभा पोटनिवडणुकीसाठी हेमंत रासने यांनी उमेदवारी अर्ज भरल्यानंतर उद्याने, गणेश मंडळ या ठिकाणी जाऊन गाठीभेटी सुरू केल्या आहेत. तर दुसरीकडे भाजपने मतदान केंद्राचे मायक्रो प्लॅनिंग करण्यासाठी माजी नगरसेवक, पदाधिकाऱ्यांची मंगळवारी बैठक घेतली. यामध्ये आजी-माजी आमदारांकडे जबाबदारी देण्याचा निर्णय घेतला. प्रभाग क्रमांक १५ सदाशिव, नारायण पेठची जबाबदारी माजी राज्यमंत्री दिलीप कांबळे यांच्याकडे आहे. प्रभाग क्रमांक १६ कसबा पंपिंग स्टेशनची आमदार सिद्धार्थ शिरोळे, प्रभाग क्रमांक १७ रास्ता पेठमध्ये माजी आमदार योगेश टिळेकर, प्रभाग क्रमांक १८ महात्मा फुले मंडई-खडकमाळ आळी येथे माजी आमदार बापूसाहेब पठारे, प्रभाग क्रमांक १९ कासेवाडी-लोहियानगर येथे आमदार सुनील कांबळे काम पाहणार आहेत. तर प्रभाग क्रमांक २९ दत्तवाडी-नवी पेठची जबाबदारी आमदार भीमराव तापकीर यांच्याकडे आहे, अशी माहिती शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी दिली. तर ७४ शक्ती केंद्रासाठी एक माजी नगरसेवक व एक पदाधिकारी प्रमुख म्हणून नियुक्ती केली आहे, असेही मुळीक यांनी सांगितले.

घाटेंनी घेतली फडणवीसांची भेट
कसब्यातील इच्छुक माजी सभागृहनेते धीरज घाटे यांनी मंगळवारी मुंबईत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन चर्चा केली. निवडणुकीसाठी केलेली तयारी, मतदारसंघातील परिस्थिती याची माहिती दिली. त्यावर फडणवीस यांनी यावेळी संधी मिळाली नसली तरी भविष्यात पक्षाकडून चांगली संधी मिळेल, असे सांगितले असल्याचे घाटे यांना सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ऊस उत्पादक शेतकऱ्यांसह साखर कारखान्यांना मोठा दिलासा, मंत्रिमंडळ बैठकीत मोठा निर्णय

बाबर आझमवर आली ७ वर्षांनंतर डोमेस्टिक क्रिकेट खेळण्याची वेळ; खराब फॉर्म अन् पाकिस्तानच्या लाजिरवाण्या पराभवानंतर PCBचा मोठा निर्णय

IPS भानु प्रताप कोण? UPSCच्या तयारीवेळी प्रेमविवाह, आता पत्नीने केले गंभीर आरोप; लेकीची बॅग घेऊन घरासमोर बसली

Latest Marathi News Update : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस फडणवीस सरकारने घेतले ७ मोठे निर्णय

Maratha Reservation: ‘नणंद म्हणून माझ्या पतीची काळजी घ्या; सौमित्रा जरांगेंची अमृता फडणवीसांना साद, गोरगरीब मराठ्यांच्या लेकरांना आरक्षण द्या’

SCROLL FOR NEXT