पुणे

‘आपलं घर’मधील मुलींसाठी माहेरघर!

CD

पुणे, ता. ८ ः मराठवाड्यातील नळदुर्ग येथील राष्ट्र सेवा दल संचलित अनाथ व निराधार मुलांसाठी काम करणाऱ्या ‘आपलं घर’मधील माजी विद्यार्थ्यांचा मेळावा पुण्यात पार पडला. मेळाव्याला दीडशेहून अधिक विद्यार्थी उपस्थित होते. ‘आपलं घर’मधून बाहेर पडलेल्या विवाहित मुलींना हक्काचे माहेर मिळावे, म्हणून नळदुर्ग येथे ‘माहेरघर’ प्रकल्प उभाण्याची संकल्पना माजी विद्यार्थी बालाजी शिंदे यांनी प्रास्ताविकामध्ये मांडली. ऑस्ट्रेलिया स्थित माजी विद्यार्थिनी छायाताई माने यांनी प्रकल्पातून बाहेर पडणाऱ्या मुलांच्या शैक्षणिक पुनर्वसनासाठी पुढाकार घेण्याचे मान्य केले.
कार्यक्रमाची सुरुवात ‘जग हे सारे सुंदर आहे’ या गीताने झाली. माजी विद्यार्थ्यांनी ‘आपलं घर’मधील अनुभवकथन केले. या प्रकल्पातील अनेक विद्यार्थी आता इंजिनिअर, डॉक्टर, प्राध्यापक, उद्योजक, व्यावसायिक झाले आहेत.
‘‘राष्ट्र सेवा दलाचे विचार आणि ‘आपलं घर’ने दिलेले संस्कार यांचा विसर न पडता भविष्यातही पुढील वाटचाल चांगल्या विचारांचीच ठेवावी, असे आवाहन क्षीरसागर यांनी केले. ‘आपलं घर’ प्रकल्प हा आदर्श व्यक्तिमत्त्व घडवणारी समाजातील बिनभिंतीची शाळा आहे,’’ असे मत श्रीपदा पोंक्षे यांनी व्यक्त केले. यावेळी आंतरजातीय विवाह केलेल्या दहा माजी विद्यार्थी-विद्यार्थिनींचा सत्कार करण्यात आला.
या मेळाव्याचे उद्‍घाटन दै. प्रजापत्रचे संपादक सुनील क्षीरसागर यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून पुणे जिल्हा सत्र न्यायाधीश श्रीपदा पोंक्षे या उपस्थित होत्या.
कार्यक्रमाचे नियोजन बालाजी शिंदे, अनिल जामगे, छाया माने, भैरवनाथ थिटे, संतोष बुरंगे, सरस्वती कांबळे, दीपक सारस्वत, समीर मुलाणी, शिल्पा डुकरे प्रवीण पाटील आदींनी केले. सूत्रसंचालन शुभांगी बिराजदार यांनी केले. आभार शेख गौसोद्धीन यांनी मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Success Story: अंगणवाडी सेविका आईच्या Gen Z लेकाने बदलले कुटुंबाचे नशीब; UPSCत ५७४ वा क्रमांक मिळवत झाला IPS, सर्व भावूक

‘आराधी आलाय नवा ग नवा’ ऐश्वर्या नारकर अन् तितीक्षा तावडेंचा धमाकेदार डान्स, नेटकरी म्हणाले... ‘एक स्वामिनी तर दुसरी दामिनी…’ Video

Rajya Sabha Candidates: राज्यसभा निवडणुकीत भाजपचा सस्पेन्स संपला; दोन राज्यांत उमेदवारांची घोषणा, कोण आहेत चेहरे? एक तर अभिनेत्री

PM Kisan: शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! पीएम किसानचा २४वा हप्ता कधी येणार? नवी अपडेट समोर

Prithviraj Chavan : ज्ञानेश कुमार यांनी राजीनामा देऊन चालणार नाही, तर त्यांना...; पृथ्वीराज चव्हाणांचे घणाघाती आरोप, फौजदारी कारवाईचीही मागणी

SCROLL FOR NEXT