पुणे

‘आहाराची भूमिका अत्यंत महत्त्वाची’

CD

भारतीय आहार पद्धती ही ऋतुनुसार बदलणारी आदर्श पद्धती आहे. मधुमेहाच्या व्यवस्थापनात आहाराची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते, असे मत राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त मधुमेह संशोधक डॉ. रवींद्र नांदेडकर यांनी व्यक्त केले.

डॉ. नांदेडकर यांची सल्ला
- सर्वसामान्य व्यक्तीसाठी गोड, खारट, आंबट, तिखट आणि तुरट या चवींचा समावेश असलेला आहार आयुर्वेदाने सांगितला आहे.
- मात्र, मधुमेही व्यक्तीच्या आहाराच्या नियोजनामध्ये कोणता आहार घ्यावा, तो कसा घ्यावा आणि किती प्रमाणात घ्यावा हे तीन मुद्दे महत्त्वाचे आहेत.
- शरीराला ऊर्जा प्राप्त करण्यासाठी आहार घेणे आवश्यक असले तरी त्याचे नियोजन योग्य प्रकारचे नसेल, तर मधुमेहाच्या व्यवस्थापनात बाधा निर्माण होऊ शकते.
- यासाठी मधुमेही व्यक्तींनी आहाराची पथ्ये न चुकता पाळावीत.
- साखर आणि गूळ या दोन्हीचा आहारातील समावेश मधुमेही व्यक्तींनी टाळणे आवश्यक असते.
- जेवणाच्या वेळा पाळणे, जेवताना वातावरण प्रसन्न ठेवणे, जेवताना टिव्ही किंवा मोबाईलचा वापर न करणे, शिळे अन्न न खाणे मधुमेहींसाठी अत्यंत आवश्यक असते.
- कर्बोदके, प्रथिने, चरबी, जीवनसत्त्व आणि खनिजे हे पाच घटक आपल्या अन्नपदार्थांमध्ये असतात आणि त्याचे योग्य नियोजन मधुमेहाचा सामना करताना महत्त्वाचे ठरते.

अनुयश आरोग्य प्रतिष्ठानतर्फे आयोजित ‘मधुसंवाद’ या उपक्रमांतर्गत ‘मधुमेह आणि आहार’ याविषयी डॉ. रवींद्र नांदेडकर बोलत होते. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे गुडविल इंडियाचे संस्थापक कालिदास मोरे, अनुयश आरोग्य प्रतिष्ठानच्या सचिव रूपाली नांदेडकर, विश्वस्त विलास नेवपूरकर उपस्थित होते. प्रास्ताविक ममता क्षेमकल्याणी यांनी केले. नेवपूरकर यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: सोनं खरेदीचा विचार करताय? दरात रातोरात मोठा बदल; मुंबई-पुण्यात 10 ग्रॅमचा भाव कुठे पोहोचला?

MahaDBT Scheme: २९ नव्या योजना महाडीबीटीवर, घरबसल्या १०५ शासकीय योजनांचे लाभ मिळणार; मुख्यमंत्र्यांची घोषणा

Maharashtra Weather : महाराष्ट्रात आज पावसाचा जोर वाढणार; पुणे,साताऱ्यासह 'या' जिल्ह्यांना येलो अलर्ट, तुमच्या भागात कसे असेल हवामान?

Landowners Compensation Hike: जमीनमालकांसाठी नुकसानभरपाईत वाढ, ४० वर्षांनंतर उच्च न्यायालयाचा निर्णय

TB मुक्तीसाठी 'सरपंचां'ना साकडं! गावागावांत 'हँड हेल्ड एक्स-रे'द्वारे स्क्रीनिंग; लक्षणे नसलेल्या रुग्णांना शोधून मोफत उपचार

SCROLL FOR NEXT