पुणे

ग्राहकांना फुकट सूप देणाऱ्या हॉटेलचालकांवर हत्याराने वार

CD

पुणे, ता. ८ : ग्राहकांना जेवणापूर्वी फुकट सूप देणाऱ्या एका हॉटेलचालकाच्या डोक्यात हत्याराने वार करण्यात आले आहेत. ही घटना खडकी परिसरात सहा फेब्रुवारी रोजी सायंकाळी साडेपाच वाजता घडली. व्यावसायिक स्पर्धेतून हा हल्ला झाल्याची माहिती पोलिसांनी दिली.

मुलायम रामकृपाल पाल (वय २७, रा. दुर्गा माता मंदिराजवळ, मिलिटरी डेअरी फार्म, खडकी) असे जखमी हॉटेलचालकाचे नाव आहे. याबाबत पाल यांनी फिर्याद दिली. त्यावरून सिद्धार्थ भालेराव आणि दिग्विजय गजरे (दोघे रा. खडकी) यांच्याविरुद्ध खडकी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पाल यांचे खडकी बाजार परिसरात चौपाटीजवळ ‘ओ शेठ’ नावाचे हॉटेल आहे. त्यांनी ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी मोफत सूप देण्याची योजना सुरू केली. आरोपी भालेराव आणि गजरे यांची खडकी चौपाटीजवळच खाद्यपदार्थ विक्रीची गाडी आहे. पाल यांच्याकडे ग्राहकांचा प्रतिसाद वाढल्यामुळे दोघे आरोपी पाल यांच्यावर चिडून होते. या वादातून आरोपींनी पाल यांना मारहाण करून डोक्यात लोखंडी हत्याराने वार केले. त्यात हॉटेलचालक पाल हा गंभीर जखमी झाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

NEET SCAM : नीट पेपरफुटी प्रकरणात मोठी अपडेट ! सीबीआयच्या अटकेत असलेल्या मनीषा मांढरे यांचे कॉलेजकडून निलंबन

ITR Update: आयकर विभागाने जारी केले सर्व ITR फॉर्म! तुमच्यासाठी कोणता योग्य? ऑनलाइन रिटर्न कसा भराल? जाणून घ्या

Kerala CM VD Satheesan : कोण आहेत केरळचे नवे मुख्यमंत्री व्ही.डी. सतीशन? 'इतक्या' संपत्तीचे आहेत मालक...

Latest Marathi News Live Update : NEET पेपरफुटीचं प्रकरण तापलं, पुण्यात NSUI कडून आंदोलन, पोलिसांनी कार्यकर्त्यांना घेतलं ताब्यात

Pune Hospital: माणुसकीला काळिमा! पुण्यातील हॉस्पिटल वाद चिघळला, १३ तासांचे बिल ३.२५ लाख, मृतदेह रोखून धरल्याचा आरोप, राष्ट्रवादीचे नगरसेवक आक्रमक..

SCROLL FOR NEXT