पुणे

दाभेकरांची माघार, कलाटे अद्याप ठाम

CD

पुणे, ता. १० : कसबा पोटनिवडणुकीतील पक्षांतर्गत बंडखोरी थोपविण्यात काँग्रेसला अखेर यश आले. पक्षात योग्य ती दाखल घेतली जाईल, असे आश्‍वासन प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिल्यानंतर बंडखोर नेते बाळासाहेब दाभेकर यांनी गुरुवारी माघार घेतली. मात्र चिंचवडच्या पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीचे बंडखोर उमेदवार राहुल कलाटे माघार न घेण्याच्या निर्णयावर ठाम असल्याचे गुरुवारी स्पष्ट झाले. त्यांनी माघार घ्यावी, म्हणून आज गुरुवारी (ता. ९) स्थानिक पातळीवरील नेत्यांनी प्रयत्न केले. परंतु; त्यास यश आले नाही.
कसबा विधानसभा पोटनिवडणुकीत काँग्रेसकडून दाभेकर यांच्यासह सतरा उमेदवार इच्छुक होते. पक्षाकडून धंगेकर यांना उमेदवारी दिल्यानंतर दाभेकर यांनी बंडखोरी करीत उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्यामुळे पक्षाला बंडखोरीची भीती होती. गेल्या तीन दिवसांपासून दाभेकर यांनी उमेदवारी मागे घ्यावी, यासाठी काँग्रेसच्या नेत्यांकडून प्रयत्न सुरू होते. दरम्यान बुधवारी दिवसभर निवडणूक निरीक्षक आणि आमदार संग्राम थोपटे, शहराध्यक्ष अरविंद शिंदे, अजित दरेकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते अंकुश काकडे यांनी दाभेकर यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, दाभेकर यांनी माघार न घेता उमेदवारी अर्ज कायम ठेवावा, यासाठी भाजपकडूनदेखील जोरदार प्रयत्न सुरू होते. भाजपच्या शहर पातळीवरील काही नेतेमंडळींनी दाभेकर यांची भेट घेतली. बुधवारी रात्री दोन वाजेपर्यंत हे नाट्य सुरू होते.
चिंचवड विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीचे बंडखोर उमेदवार राहुल कलाटे यांनी माघार घ्यावी म्हणून आज गुरुवारी (ता. ९) स्थानिक पातळीवरील नेत्यांनी प्रयत्न केले. परंतु; त्यास यश आले नाही. त्यामुळे कलाटे निवडणूक लढविण्याबाबत गुरुवारपर्यंत ठाम होते. राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे वरिष्ठ नेते माघार घेण्याबाबत त्यांच्याशी बोलणार आहेत.
कलाटे यांच्याशी अजित पवार यांनी बोलावे, अशी विनंती पक्षाचे निरीक्षक, आमदार सुनील शेळके यांनी केली. त्यानुसार पवार गुरुवारी रात्री किंवा उद्या (शुक्रवारी) सकाळी कलाटे यांच्याशी माघार घेण्याबाबत बोलणार आहेत, अशी माहिती राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे, संजोग वाघेरे यांनी दिली. तर; शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्यावतीने पुणे व पिंपरी-चिंचवड संपर्क प्रमुख आमदार सचिन अहीर उद्या सकाळी दहाला कलाटे यांच्याशी शहरात येऊन बोलणार आहेत.

अजित पवार यांची आढावा बैठक
अजित पवार यांनी आज माजी नगरसेवक मोरेश्‍वर भोंडवे यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. यावेळी त्यांनी राष्ट्रवादीच्या आजी-माजी पदाधिकाऱ्यांशी प्रचाराबाबत चर्चा केली. तसेच; शिवसेनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांशीही प्रचाराबाबत नियोजन केले. यावेळी शिवसेनेचे शहर प्रमुख सचिन भोसले, उप जिल्हाप्रमुख रोमी संधू, अनंत कोऱ्हाळे, संतोष पवार आदी उपस्थित होते.

राहुल कलाटे यांनी माघार घ्यावी म्हणून वरिष्ठ पातळीवरून चर्चा सुरु आहे. सचिन अहीर उद्या (शुक्रवारी) त्यांच्याशी बोलणार आहेत.
- सचिन भोसले, शहर प्रमुख, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 LSG vs RR : केएल शेर तर संजू सवा शेर! राजस्थानचा एक पाय प्ले ऑफमध्ये

DC vs MI : गोलंदाजीतली 'गळती' मुंबईच्या मुळावर; बॅटिंगमध्ये फर्स्ट क्लास तर बॉलिंगमध्ये नापास

Jolly LLB 3 : आता रंगणार जॉली विरुद्ध जॉली केस; सिनेमाच्या शूटिंगबाबत महत्त्वाची अपडेट आली समोर

Google वर जाहिराती करण्यासाठी भाजपने खर्च केले 100 कोटी; BJP पहिल्या स्थानावर तर काँग्रेस कितव्या स्थानावर? वाचा सविस्तर...

CM Yogi Aadityanath : ''काशी अन् अयोध्येनंतर आता मथुरेकडे प्रस्थान...'' योगी आदित्यनाथांचे स्पष्ट संकेत

SCROLL FOR NEXT