पुणे

पोलिस ठाण्याच्या आवारात सासुवर चाकूने हल्ला

CD

पुणे, ता. १५ : कौटुंबिक हिंसाचाराची तक्रार देण्यासाठी मुलीबरोबर आलेल्या सासुवर जावयाने चाकूने वार केल्याची घटना पोलिस ठाण्याच्या आवारात घडली. हडपसर पोलिस ठाण्यात शनिवारी (ता. ११) हा प्रकार घडला.
चाकू हल्ला होत असल्याचे एका पोलिस उपनिरीक्षकाने पाहिल्याने त्यांनी प्रसंगावधान राखून संबंधिताला पकडले. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. पुष्पा दामोदर पालवे (वय ४६, रा. महादेवनगर, मांजरी) असे जखमी सासूचे नाव आहे. या प्रकरणी जावई मंगेश महादा तारे (वय २९, रा. वडगाव शेरी) याला अटक केली आहे. याबाबत सासरे दामोदर यांनी हडपसर ठाण्यात फिर्याद दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगेश आणि त्याची पत्नी पूजा हे वडगाव शेरीत राहायला आहेत. मंगेश पत्नीला त्रास देत होता. त्यामुळे पूजा माहेरी निघून आली होती. पूजा आणि तिची आई पुष्पा शनिवारी सायंकाळी हडपसर पोलिस ठाण्यात तक्रार देण्यासाठी आल्या होत्या. त्यावेळी मंगेश तेथे आला. आमच्यात वाद नसल्याचे त्याने पोलिसांना सांगितले. त्यानंतर सासू पुष्पा यांचे पाय त्याने धरले आणि पाया पडण्याचा बहाणा केला. त्यानंतर मंगेशने स्वेटरमध्ये लपविलेला चाकू बाहेर काढला आणि सासू पुष्पा यांच्यावर हल्ला चढविला. त्यावेळी पोलिस उपनिरीक्षक संतोष गोरे तेथे होते. त्यांनी त्वरित मंगेशला रोखले व चाकू ताब्यात घेतला. रात्री उशिरा त्याला अटक केली, असे हडपसर ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अरविंद गोकुळे यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'आम्ही १५ वर्षांचे असताना असे नव्हतो...' Vaibhav Sooryavanshi बद्दल अभिषेक शर्मा नेमकं काय म्हणाला?

Gangapur News : अल्पवयीन पीडितेवर अत्याचार प्रकरणात आरोपीला ७ वर्षे सश्रम कारावास; गंगापूर न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल

विजय साळगावकर सुटलाच नसता, 'दृश्यम ३' मध्ये सगळ्यात मोठी चूक; पोलिसांनी दुर्लक्षित केली ती गोष्ट, तुम्हाला कळली का?

Wani News : दिंडोरीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने रास्ता रोको; शेतकरी, आदिवासी व नागरिकांच्या विविध मागण्यांसाठी आंदोलन, दुष्काळी यादीत तालुक्याचा समावेश करण्याची मागणी

FlyDubai Co-Pilot Case : इस्रायलमध्ये विमान क्रॅश करण्याचा कट; फ्लाईदुबईच्या को-पायलटला होणार 'फायरिंग स्क्वॉड'द्वारे मृत्युदंड?

SCROLL FOR NEXT