पुणे

गुगलचे कार्यालय बॉम्बने उडविण्याच्या धमकीमुळे खळबळ

CD

पुणे, ता. १३ : पुण्यातील गुगलचे कार्यालय बॉम्बने उडवून देण्याबाबत धमकीचा निनावी फोन आल्यामुळे एकच खळबळ उडाली. बॉम्बशोधक व नाशक पथकाने गुगलचे कार्यालय आणि परिसरात कसून तपासणी केली, परंतु पथकाला काहीही संशयास्पद आढळून आले नाही. दरम्यान, मुंबई पोलिसांनी निनावी फोन करणाऱ्या व्यक्तीस हैदराबाद येथून अटक केली आहे.

पुण्यातील मुंढवा परिसरात एका कमर्शिअल बिझनेस सेंटरच्या इमारतीमध्ये गुगलचे कार्यालय आहे. रविवारी रात्री मुंबईतील गुगलच्या कार्यालयात एकाचा निनावी फोन आला. त्या व्यक्तीने पुण्यातील गुगलच्या कार्यालयात बॉम्ब ठेवल्याचे सांगितले. त्यावर गुगलच्या अधिकाऱ्यांनी मुंबई पोलिसांना ही माहिती दिली. मुंबई पोलिसांनी ही बाब पुणे पोलिसांना कळविली. त्यानंतर मुंढवा पोलिस आणि बॉम्बशोधक पथक तातडीने गुगलच्या कार्यालयात पोचले. त्यांनी कार्यालय आणि इमारतीच्या परिसरात तपासणी केली. मात्र, काहीही तथ्य आढळून आले नाही.

मुंबई पोलिसांना तपासादरम्यान तो फोन हैदराबाद येथून आल्याचे निष्पन्न झाले. त्यावरून हैदराबाद पोलिसांच्या मदतीने निनावी फोन करणाऱ्या व्यक्तीला अटक केली. तो पुण्यातील गुगल कार्यालयात काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्याचाच भाऊ आहे. रात्री मद्यधुंद अवस्थेत त्याने हा फोन केल्याची माहिती समोर आली आहे.
-----

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मुंबई लोकलचा जम्बो ब्लॉक! 'या' लोकल रद्द, मेल, एक्स्प्रेस सेवांवरही परिणाम; कधी आणि कुठे? वेळापत्रक पहाच

मालदीवमध्ये स्पीडबोट समुद्रात उलटली; उद्योगपती गौतम सिंघानिया जखमी; ५ जण बेपत्ता

Panchang 21 March 2026: शनि वज्रपंजर कवच स्तोत्राचे पठण आणि ‘शं शनैश्चराय नमः’ या मंत्राचा जप करावा

Sports News: पुणे, महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचे माहेरघर: मागील १२ वर्षांत आठ वेळा यजमानपद

सातारा झेडपीवर प्रथमच भाजपाचा झेंडा, मुख्यमंत्र्यांच्या फोननंतर छत्रपती शिवेंद्रसिंहराजेंची खेळी

SCROLL FOR NEXT