पुणे

टपाली मतदान गुरुवारपासून सुरू

CD

पुणे, ता. १५ : केंद्रीय निवडणूक आयोगाने यंदा कसबा पेठ विधानसभेच्या पोटनिवडणुकीमध्ये ८० वर्षांपेक्षा जास्त वय असलेले मतदार व दिव्यांग मतदार यांच्यासाठी टपाली मतदान करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. या मतदारसंघातील २९९ ज्येष्ठ नागरिक व ४ दिव्यांग मतदारांनी या सुविधेचा लाभ घेण्यासाठी नोंदणी केली असून, गुरुवारपासून (ता. १६) ते २२ तारखेपर्यंत मतदान अधिकारी संबंधित व्यक्तींच्या घरी जाऊन टपाली मतदान घेणार आहेत.

टपाली मतदानासाठी आठ पथके असून, या पथकांमध्ये मतदान अधिकारी, कर्मचारी, पोलिस, व्हिडिओग्राफर असतील. गोपनीयतेचा भंग होणार नाही, अशा पद्धतीने टपाली मतदानाचे व्हीडिओ शूटिंग केले जाणार आहे, अशी माहिती कसबा पेठ विधानसभा मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी स्नेहा किसवे-देवकाते यांनी दिली.

त्या म्हणाल्या, ‘‘मतदान घेण्यासाठीचे आवश्‍यक ते प्रशिक्षण कर्मचाऱ्यांना देण्यात आले आहे. तसेच याची पूर्वतयारीसुद्धा पूर्ण झाली आहे. या कामकाजासाठी प्रत्यक्ष अशा मतदारांच्या घरी जाऊन त्यांचे मतदान घेण्यासाठी ८ पथकांची नेमणूक केली आहे. या पथकामध्ये पथकप्रमुख तथा मतदान अधिकारी क्र. १ म्हणून सेक्‍टर ऑफिसर, मतदान अधिकारी क्र. २ म्हणून महसूल कर्मचारी यांची नियुक्ती केली आहे. या कामकाजावर निरीक्षण ठेवण्यासाठी मायक्रो ऑब्झर्व्हर, मतदान प्रक्रियेचे चित्रीकरण करण्यासाठी व्हिडिओग्राफर व पोलिस कर्मचारी यांचा पथकामध्ये समावेश करण्यात आलेला आहे.’’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

दुष्काळग्रस्तांच्या मदतीला धावले शेगावचे गजानन महाराज संस्थान, १ कोटी ११ लाख रुपये दिले मुख्यमंत्री सहायता निधीत

Asian Games 2026 : नवी मुंबईच्या Harita Bhadra ने ०.०१ सेकंदाच्या फरकाने जिंकले पदक; आहे भारताची दुसरी सर्वात वेगवान धावपटू

Election Commission controversy: मुख्य निवडणूक आयुक्तांवर गंभीर आरोप; पृथ्वीराज चव्हाण यांची ज्ञानेश कुमार यांना पदावरून हटवण्याची मागणी

चीन अमेरिकन कंपन्यांचे AI तंत्रज्ञान चोरत आहे का? पाहा 'डिस्टिलेशन' म्हणजे काय? ज्यावरून USA अन् China मध्ये रंगलाय वाद...

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या औषध निरीक्षक पेपरफुटीप्रकरणी मोठी अपडेट

SCROLL FOR NEXT