पुणे

माजी मंत्री खंदारे यांच्यावर बलात्काराचा गुन्हा

CD

पुणे, ता. १६ : शासकीय विश्रामगृहात महिलेला पल्या चाकूचा धाक दाखवून तिच्यावर अत्याचार केल्याप्रकरणी शिवसेनेचे माजी राज्यमंत्री उत्तमप्रकाश खंदारे यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुलाचा सांभाळ करतो. तसेच लग्नाचे आमिष देत चाकूचा धाक दाखवून बलात्कार केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

या प्रकरणी एका ३७ वर्षीय महिलेने बिबवेवाडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी उत्तमप्रकाश खंदारे (वय ६५, रा. सोलापूर), त्याचे साथीदार महादेव भोसले, बंडू दशरथ गवळी (रा. सोलापूर) यांच्यासह एका महिलेवर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार बी रेस्ट हाऊस व बिबवेवाडीत २०१२ पासून ते आजपर्यंत घडला आहे. खंदारे हे शिवसेना-भाजप युती सरकारमध्ये सामाजिक न्याय तथा क्रीडा मंत्री होते. तसेच उत्तर सोलापूर विधानसभा मतदारसंघातून ते चार वेळा आमदार म्हणून निवडून आले होते.

खंदारे याने फिर्यादी यांना लग्नाचे आमिष दाखविले व त्यांच्या मुलाचा सांभाळ करतो असे सांगितले. त्यानंतर फिर्यादी यांना चाकूचा धाक दाखवून त्यांच्यावर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. फिर्यादींनी नकार दिला असता त्या पळून जाऊ नये, म्हणून त्याने फिर्यादीस विवस्त्र करून मारहाण केली. ही बाब कोणाला सांगितल्यावर खंदारे व इतरांनी फिर्यादी यांना जीवे मारण्याची धमकी दिली होती. याबाबत खंदारे यांची बाजू समजून घेण्यासाठी त्यांना संपर्क करण्यात आला. मात्र संपर्क होऊ शकला नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJP Protest Shivaji Park : अभिजित दिपके मुंबई पोलिसांच्या रडारवर? शिवाजी पार्कवरील आंदोलन बेकायदेशीर?; CJPच्या चार पदाधिकाऱ्यांविरोधात तक्रार

Latest Marathi News Live Update : दिवसभरात काय घडलं? देशविदेशातील घडामोडी वाचा एका क्लिकवर

MPSC Student Agitation Issue : एमपीएससी आंदोलनातील फूट; शिष्टमंडळाच्या परस्पर निर्णयाने विद्यार्थ्यांमध्ये संताप

Gangapur News : गंगापूर तालुक्यात खरीप हंगामच्या पंचनाम्याला वेग; दोन दिवसात १६ हजार हेक्टरहून अधिक क्षेत्राचा पंचनामा पूर्ण

Satara District Bank Election : भाजप, राष्ट्रवादीने वाढवले उंडाळकरांचे टेन्शन! बाळासाहेब पाटलांसह भाजपचे तीन दिग्गज मैदानात; उमेदवारीचा दावेदार कोण याचीच उत्सुकता

SCROLL FOR NEXT