suresh prabhu sakal
पुणे

Sakal Maha Conclave : सहकारावर सर्वंकष धोरण तयार होणार; सुरेश प्रभू

माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांची माहिती

सकाळ वृत्तसेवा

पुणे : सहकार क्षेत्र हा देशाच्या विकासातला महत्त्वाचा प्रमुख घटक आहे. खासगी क्षेत्रातून आर्थिक, सामाजिक विषमता दूर होईल का नाही, माहीत नाही, पण सहकारातून ती निश्चित होऊ शकते, असे मत माजी केंद्रीय मंत्री तथा राष्ट्रीय सहकार धोरण समितीचे चेअरमन सुरेश प्रभू यांनी व्यक्त केले.

सहकाराची ही ताकद विचारात घेऊनच, सरकार लवकरच यावर सर्वंकष धोरण तयार करणार आहे, अशी माहितीही त्यांनी दिली. ‘सकाळ माध्यम समूहा’च्या वतीने आयोजित सहकार परिषदेमध्ये ‘सहकारी बँकांसाठी धोरणात्मक निर्णय’ या विषयावर प्रभू बोलत होते. ते म्हणाले, ‘‘सहकारी संस्थांमध्ये काही बदल आवश्यक आहेत.

सहकार क्षेत्राला बदनामीही स्वीकारावी लागते. पण, काही गोष्टी स्वीकाराव्या लागतील. सहकार क्षेत्र शेतीत अधिक रुजते आहे. साखर कारखाने, दुग्ध व्यवसाय, सूत गिरणी या संस्थांचा विचार करता, त्यात पुढील काळात सहकाराला चालना देणे, पूरक धोरण आखणे गरजेचे आहे. त्यासाठी केंद्र सरकारने स्वतंत्र सहकार खाते निर्माण केले.

त्याची जबाबदारी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे दिली आहे. गेल्या काही महिन्यांत दूरगामी आणि धाडसी निर्णयही त्यांनी घेतले. सरकारी धोरणांचा एवढा मोठा पाठिंबा असल्याने आगामी काळात सहकार प्रचंड वेगाने प्रगती करेल. केवळ सहकाराच्या बळावर भारताची अर्थव्यवस्था २२ ते २५ ट्रिलियन डॅालरची असेल.’’

सहकार हाच ठरेल विकासाचा मार्ग
सहकारी धोरणामध्ये बदल केले पाहिजेत. तंत्रज्ञानाचा वापर वाढवला पाहिजे. अडचणीत असणाऱ्या संस्थांसाठी सामाईक फंड तयार केला पाहिजे. लहानात लहान सहकारी संस्थांनाही त्याचा फायदा होईल. सहकारी संस्थांना जास्तीत जास्त मोकळीक दिली पाहिजे. सहकारी संस्थांना करप्रणालीचा सामना करावा लागतो, मग त्यात जीएसटी, आयकर असो, याबाबत धोरण आखले पाहिजे. सध्या त्यावर काम सुरु असल्याचे सुरेश प्रभू यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Terror plot: गरीबनगर कारवाईचा बदला घेण्यासाठी मुंबईत हल्ल्याचा कट; आयएसआय-दाऊद कनेक्शनसह नऊ आरोपी अटकेत

Vaibhav Sooryavanshi: तू किती दूध पितोस?" रवी शास्त्रींच्या प्रश्नावर Vaibhav Sooryavanshi चं उत्तर ऐकून सगळेच हसू लागले! VIDEO व्हायरल

'मी तृप्तीला दहाव्या मिनिटाला म्हणालो, चल' सिद्धार्थ जाधव रणवीर-दीपिकाच्या लग्नाच्या रिसेप्शनमधून लगेच निघून गेलेला, म्हणाला...

कोकण रेल्वेचे आस्ते कदम! तेजस एक्स्प्रेस १२ तास लेट; मांडवी, कोकणकन्याही ४ तास उशिरा, चाकरमानी हैराण

RCB vs GT Final: विराट कोहली-साई सुदर्शन भिडले, भर मैदानातच एकमेकांशी वाद घालतानाचा Video Viral

SCROLL FOR NEXT