पुणे

शिक्षण विभागातील लेखाधिकारी लाच घेताना ताब्यात

CD

पुणे, ता. २० : सेवा पुस्तिकेत वेतन निश्चितीची पडताळणी करण्यासाठी पाच हजार रुपयांची लाच स्वीकारताना शिक्षण विभागातील वरिष्ठ महिला लेखाधिकाऱ्यासह दोघांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) ताब्यात घेतले. कॅम्पमधील सिनेगॉग स्ट्रीट येथील शिक्षण विभागाच्या कार्यालयात सोमवारी दुपारी ही कारवाई करण्यात आली.

प्रमिला प्रभाकरराव गिरी (वय ३८, वरिष्ठ लेखाधिकारी वर्ग-२) असे कारवाई केलेल्या महिला लेखाधिकाऱ्याचे नाव आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे सहायक पोलिस आयुक्त श्रीहरी पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, शिक्षकांच्या निवड श्रेणीसाठी प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर सेवा पुस्तिकेत नोंद केली जाते. सहावा आणि सातव्या वेतन आयोगानुसार सेवा पुस्तिकेत वेतन निश्चित करण्यासाठी लेखाधिकाऱ्यांची स्वाक्षरी, शिक्का आवश्यक असतो. त्यासाठी पैशांची मागणी केल्याची तक्रार एका शिक्षिकेने केली होती. या तक्रारीची पडताळणी केली असता गिरी यांनी तक्रारदाराकडे सहा हजार रुपयांची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. त्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस अधीक्षक अमोल तांबे, अतिरिक्त अधीक्षक सूरज गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस आयुक्त विजयमाला पवार, त्यांच्या पथकातील पोलिस कर्मचारी रियाज शेख, सुनील सुरडकर यांनी शिक्षण विभागाच्या कार्यालयात दुपारी अडीच वाजता छापा टाकून लेखाधिकारी गिरी आणि कनिष्ठ लेखापरीक्षक अनिल श्रीधर लोंढे या दोघांना ताब्यात घेतले. कार्यालयाची झडती घेतली असता टेबलच्या ड्रावरमध्ये सुमारे ६० हजार रुपये आढळले. याप्रकरणी लष्कर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. या कारवाईमुळे शिक्षण विभागात खळबळ उडाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

परदेशी भक्तांकडून श्री विठ्ठलाच्या महापूजेची नोंदणी! अमेरिका, ऑस्ट्रेलिया, जर्मनी, दुबईतील भाविक करणार महापुजा; मंदिर समितीला ९० लाखांचे उत्पन्न, वाचा...

मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाहून परतताना भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू; पिकअपने धडक देताच बस उलटली

Pune Crime : प्रति तोळा फक्त ६० हजार, स्वस्त सोन्याच्या आमिषाने उकळले पैसे; दाम्पत्याला अटक

LPG Crisis: देशहितासाठी त्याग! ६ महिने सिलेंडरला पूर्ण ‘नकार’; महाराष्ट्रातील गावांचा मोठा निर्णय, LPG वापर बंद राहणार

Pune News : पतीला मारहाण अन् सासरच्यांना शिवीगाळ; पुण्यात पत्नीच्या 'क्रूर' वर्तनामुळे घटस्फोट मंजूर; कौटुंबिक न्यायालयाचा मोठा निकाल

SCROLL FOR NEXT