पुणे

कविता, समूहगीत, पोवड्याचे सादरीकरण

CD

पुणे : विद्यावर्धिनी इंग्लिश मीडियम स्कूल आणि भारत इंग्लिश स्कूल यांच्या वतीने शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी भारत इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्या उज्ज्वला पिंगळे, विद्यावर्धिनी इंग्लिश मीडियम स्कूलच्या प्राचार्या रेणू सुंबाली, उपप्राचार्या मनीषा हवालदार, संस्था पर्यवेक्षिका पूजा भुरके आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी विद्यार्थ्यांनी कविता, समूहगीत, पोवाडा यांचे सादरीकरण केले. शाळेच्या आवारात छोटेखानी मिरवणूक काढण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रज्ञा शुक्ल यांनी केले. तर संतोष सुक्रे यांनी उपस्थितांचे आभार मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन यांनी केले. कार्यक्रमास दोन्ही प्रशालेतील शिक्षक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

नृत्य, नाट्य, मर्दानी खेळ
पुणे : कोथरूड येथील राजा श्री शिवराय प्रतिष्ठानच्या श्री सद्‍‌गुरू बाबा महाराज सहस्रबुद्धे विद्यामंदिर शाळेत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त विद्यार्थ्यांनी गाणी, नृत्य, नाटय व मर्दानी खेळांची प्रात्यक्षिके सादर केली. शाळेच्या मुख्याध्यापिका स्वाती जोशी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला आणि कार्यक्रमाला सुरवात झाली. यावेळी विद्यार्थ्यांनी सादरीकरण केले. मुलींनी सादर केलेल्या लाठी-काठी व तलवारबाजीच्या प्रात्यक्षिकाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. कार्यक्रमासाठी सीमा गोरे, रामदास कामथे, स्मिता सावंत, बाळासाहेब घिगे, अमोल जाधव, प्रवीण गाडेकर, सेवक सुभाष घोलप, अलका पायगुडे आणि रूपेश विश्वकर्मा यांनी सहकार्य केले.

सन-ब्राईट स्कूलमध्ये शिवजयंती साजरी
पुणे : सन-ब्राईट स्कूलमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी झाली. यावेळी संस्थेचे संस्थापक संदीप बेलदरे पाटील, संस्थापिका शुभांगी बेलदरे पाटील, माध्यमिक विभागाच्या मुख्याध्यापिका मंदा भूमकर, प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक सुधीर शिंदे, कॉलेजचे प्राचार्य रूपेश पेटकर, इंग्रजी विभागाचे मुख्याध्यापक शशिकांत कडू, किलबिल बालक मंदिरच्या मुख्याध्यापिका सुवर्णा सुर्वे, पर्यवेक्षक संपत गुरव आदी उपस्थित होते. शिवजन्म सोहळा, पोवाडा, शिवगर्जना अशा विविध कार्यक्रमांचे यावेळी झाले.

अभिनव शाळेत शिवजयंती उत्साहात
पुणे : नऱ्हे येथील अभिनव इंग्लिश सीबीएसई शाळेत शिवजयंती उत्साहात साजरी झाली. शाळेच्या प्राचार्या डॉ. वैशाली कुलकर्णी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन केले. विद्यार्थ्यांनी मराठमोळ्या पोशाख परिधान केला. यानिमित्त पोवाडा, शिवस्तुती गायन यांचे सादरीकरण झाले. लाठी काठी, दांडपट्टा, यांसारखे क्रीडा प्रकार विद्यार्थ्यांनी सादर केले. ढोल-ताशांच्या गजरात महाराजांच्या नामाचा जयघोष करत मिरवणूक काढण्यात आली. यावेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष राजीव जगताप, खजिनदार ध्रुवजी जगताप उपस्थित होते.


विद्यार्थ्यांकडून राज्यगीत सादर
पुणे : विधान भवनात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त उत्सव साजरा करण्यासाठी लक्ष्मणराव आपटे प्रशालेस खास आमंत्रित करण्यात आले. यावेळी शाळेच्या विद्यार्थ्यांनी ‘जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा’ हे राज्यगीत सादर केले. शाळेच्या मुख्याध्यापिका मेधा सिन्नरकर, जास्मिन सय्यद आदी मान्यवर उपस्थित होते. प्रशालेतील शिक्षिका माधवी कुलकर्णी यांनी विद्यार्थ्यांकडून यासाठी तयारी करून घेतली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'काँग्रेसने दोनदा बाबासाहेबांचा पराभव केला, प्रकाश आंबेडकरांना सोडून दिलं'; बावनकुळेंचा जोरदार प्रहार

Pune Loksabha Constituency : प्रांतिक तैलिक महासभेचा भाजपचे उमेदवार मोहोळ यांना पाठिंबा जाहीर

Indian Ocean : सगळ्यात वेगाने तापतोय हिंदी महासागर; ग्लोबल वॉर्मिंगचा अरबी समुद्राला बसणार मोठा फटका! भारताला किती धोका?

Fact Check: उद्धव ठाकरेंना काँग्रेस कार्यकर्ते बोलू देत नसल्याचा दावा खोटा; प्रचार सभेतील अर्धवट व्हिडिओ व्हायरल

Latest Marathi News Live Update : व्होट बँकेसाठी काँग्रेसने राम मंदिराचा अपमान केला - पंतप्रधान मोदी

SCROLL FOR NEXT