पुणे

पालकमंत्री आहात, मालकमंत्री नाही चंद्रकांत पाटील यांच्यावर मोहन जोशी यांची टीका

CD

पुणे, ता. २३ : ‘‘पन्नास हजारांच्या मताधिक्याने आमचा उमेदवार निवडून येणार असे भाजप नेते सांगत आहेत. त्यांचा विजय एवढा सोपा आहे तर मग ते गुंडांचा आणि शासकीय यंत्रणेचा वापर का करत आहेत, पालकमंत्र्यांना घर बदलून सुभाषनगरमध्ये घर का घ्यावे लागले,’’ असा सवाल करून ‘‘मुख्यमंत्री रात्री येतात, तीन-तीन पर्यंत कसब्यात फिरतात. पालकमंत्री धंगेकरांना निवडून दिले तर निधी मिळणार नाही, अशी धमकी देतात. तुम्ही पालकमंत्री आहेत, मालकमंत्री नाहीत,’’ अशी टीका काँग्रेस नेते मोहन जोशी गुरुवारी केली.

महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्या प्रचारार्थ काँग्रेस भवन येथे गुरुवारी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. भाजप महायुतीच्या‌ उमेदवारासाठी केंद्रीय मंत्र्यांसह राज्यातील मंत्री, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तळ ठोकून बसले आहेत. त्यांच्याकडून साम-दाम-दंड-भेद वापरले जात आहे, पोलिस व प्रशासकीय यंत्रणेचा गैरवापर केला जात आहे. परंतु या निवडणुकीत धनशक्तीच्या विरोधात जनशक्तीचा विजय होणार, असा दावाही त्यांनी केला.

भाजपच्या नेत्यांना भीती वाटत आहे, पराभव झाला तर मोदी-शहांना काय सांगायचे. पालकमंत्री व इतर पदे जातील. त्यामुळे शासकीय यंत्रणांचा गैरवापर केला जात आहे, प्रचारासाठी शासकीय वाहने वापरली जात आहेत. कालच पालकमंत्र्यांनी प्रचाराच्या पदयात्रेसाठी शासकीय वाहन वापरले. त्याचा फोटो मी स्वत: काढून निवडणूक आयोगाला पाठवला आहे. तसेच पालकमंत्र्यांवर निवडणूक आचारसंहितेचा भंग केल्याचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे, असेही ते म्हणाले.

या वेळी धंगेकर यांना बहुजन जनता दल, रिपब्लिकन पार्टी (डेमोक्रॅटिक) बागवान समाज सेवा, नदाफ पिंजारी मन्सुरी मुस्लिम जमात, सोलापूर जिल्हा जिव्हाळा प्रतिष्ठान यांच्यासह विविध संघटनांनी पाठिंबा जाहीर केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Delhi News: दिल्लीतील अनेक शाळांना बॉम्बने उडवून देण्याची धमकी; पोलीस अलर्ट, सर्च ऑपरेशन सुरु

LPG Price 1 May: सामान्यांना दिलासा! LPGच्या किमतीत मोठी घट, जाणून घ्या नवे दर

IPL 2024 MI vs LGS : मुंबईचा ‘प्लेऑफ’चा मार्ग खडतर ; लखनौचा विजय,स्टॉयनिसची चमक

Bicycle Crunches: सायकल क्रंच करताना 'या' चुका करू नका, जाणून घ्या योग्य पद्धत

Mumbai News: दुर्गम भागातील नाही, भांडुपमधील प्रकार! डॉक्टरांनी केली टॉर्चच्या प्रकाशात प्रसूती, महिलेसह बाळाचा मृत्यू!

SCROLL FOR NEXT