पुणे

राज्याच्या हायड्रोजन धोरणासाठी बैठक

CD

पुणे, ता. २८ ः राज्याच्या हरित हायड्रोजन ऊर्जा धोरणासाठी सहयोगी संस्थांबरोबर नुकती बैठक आयोजित करण्यात आली होती. सरकारच्या ऊर्जा विभागाच्या निर्देशानुसार महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण (महाऊर्जा) तर्फे वांद्रे पूर्व येथील प्रकाशगड येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
बैठकीच्या अध्यक्षस्थान विभागाच्या प्रधान सचिव आभा शुक्ला या होत्या. तर महावितरणचे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल, महानिर्मितीचे व्यवस्थापकीय संचालक पी. अनबलगन, महाऊर्जाचे महासंचालक रवींद्र जगताप आदी बैठकीला उपस्थित होते. सूत्रसंचालन आनंद रायदुर्ग यांनी केले. बैठकीत महावितरण, महापारेषण, महानिर्मिती, महाराष्ट्र राज्य विद्युत नियामक आयोग, महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळ, महाराष्ट्र सरकारचा उद्योग विभाग, पाणी पुरवठा विभाग तसेच वाहतूक, खत उत्पादन, पेट्रोलियम उत्पादन कंपनी, हरित ऊर्जा उत्पादक, इलेक्ट्रोलायझर उत्पादक आदी उपस्थित होते. केपीएमजी कंपनीतर्फे महाराष्ट्रातील हायड्रोजन वापर, हरित हायड्रोजनचा विकास व भविष्यातील संधी यांबाबत सादरीकरण केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Brij Bhushan Singh: भाजपनं ब्रिजभूषण सिंहचं तिकीट कापलं! पण मुलाला दिली उमेदवारी; रायबरेलीचाही उमेदवार जाहीर

Prajwal Revanna: "रेवन्ना प्रकरणी प्रधानमंत्र्यांनी 'त्या' पीडित महिलांची माफी मागावी"; राहुल गांधींची मागणी

Naach Ga Ghuma: बॉक्स ऑफिसवर 'नाच गं घुमा'चा धुमाकूळ; ओपनिंग-डेला केली इतकी कमाई

Fridge Tips : उन्हाळ्यात फॅनला जसा आराम देतो तसा फ्रीजलाही द्यावा का? 1-2 तास बंद ठेवला तर फायदा होतो की नुकसान?

Auto-Brewery Syndrome : एक घोटही न पिता हा माणूस असतो टल्ली.. याचं शरीरच तयार करतं अल्कोहोल! जडलाय विचित्र आजार

SCROLL FOR NEXT