पुणे

अहमदनगर कॉलेजचा आनंद मुठा प्रथम

CD

पुणे, ता. २८ ः इंडियन सोसायटी ऑफ ॲनालिटिकल सायंटिस्ट, पुणे चॅप्टर आणि एच. व्ही. देसाई कॉलेजच्या वतीने ‘प्रोफेसर एस. एफ. पाटील लेक्चर कॉम्पिटिशन’ नुकतीच आयोजित करण्यात आली होती. यामध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्नित पुणे, नगर, नाशिक जिल्ह्यामधील महाविद्यालयांतील २४ रसायनशास्त्राचे पदव्युत्तर विद्यार्थी सहभागी झाले होते. ‘इमर्जिंग टेक्नॉलॉजीज इन केमिस्ट्री’ या विषयावर विद्यार्थ्यांनी सादरीकरण केले.
स्पर्धेत अहमदनगर कॉलेजच्या आनंद मुठा यांनी प्रथम क्रमांक तर गणेशखिंड येथील मॉडर्न कॉलेजच्या शीतल पारे यांनी द्वितीय क्रमांक पटकावला. तृतीय क्रमांक वाघोलीच्या बीजेएस कॉलेजच्या सुहानी पटेल यांनी तर एच. व्ही. देसाई कॉलेजच्या निशा काकडे यांनी उत्तेजनार्थ पारितोषिक पटकाविले. उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ व भारती विद्यापीठाचे माजी कुलगुरू प्रा. एस. एफ. पाटील यांनी स्पर्धेचे उद्‍घाटन केले. प्राचार्य डॉ. राजेंद्र गुरव यांनी स्वागत केले. पुणे चॅप्टरच्या अध्यक्षा डॉ. निलीमा राजूरकर यांनी विविध उपक्रमांची माहिती दिली. या वेळी कार्यवाह दिलीप जागड, उपप्राचार्या डॉ. राजश्री पटवर्धन उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Weather : राज्यात विजांसह पावसाची शक्यता; पुढील ५ दिवसांचा हवामान अंदाज

Parag Shah: ३३८३ कोटींचे आमदार रस्त्यावर उतरले; भिक्षेकऱ्याचा वेश करून मागितली भिक्षा, नेमकं कारण काय?

IMD Weather Update: मॉन्सून शनिवारपासून परतीच्या मार्गावर : ‘आयएमडी’ पश्चिम राजस्थानातून घेणार माघार

Maharashtra Police Recruitment: पोलीस भरतीची तयारी करणाऱ्यांसाठी गुड न्यूज! राज्यात ८१०० पदांसाठी नववर्षात भरती; सोलापुरात ११७ जागा

जीवनमान-जीवनभान : व्यायामाने जपूया मानसिक आरोग्य

SCROLL FOR NEXT