पुणे

पुणे बुक फेअरचे गुरुवारी आयोजन

CD

पुणे, ता. ४ : पश्चिम भारतातील सर्वात मोठे ग्रंथ व शिक्षण प्रदर्शन ‘पुणे बुक फेअर’ म्‍हणजे ‘पुणे पुस्तक जत्रा’ या मालिकेतील २०वे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. या चार दिवसीय प्रदर्शनात इंग्रजी, मराठी, हिंदी, उर्दू, संस्कृत, आणि इतर भाषेतील पुस्तके, वृत्तपत्रे, साप्ताहिके, मासिके व ग्रंथ एकाच छताखाली उपलब्ध होणार आहेत, अशी माहिती प्रदर्शनाचे आयोजक पी.एन.राजन आणि दीपक करंदीकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
प्रदर्शनात देशातील शैक्षणिक संस्था, भारत सरकार व महाराष्ट्र सरकारची प्रकाशने, नामवंत पुस्तक विक्रेते-वितरक, प्रकाशन संस्था, माहिती, आरोग्य व्यवस्थापन, व्यापार, कायदा, धर्म, राजकारण, साहित्य अशा विविध विषयांवरील पुस्‍तके, मासिके, ग्रंथ आदी उपलब्ध राहणार आहेत. या प्रदर्शनाचे उद्‌घाटन गुरुवारी (ता. ९) सकाळी ११ वाजता येरवडा येथील क्रिएटी सिट मॉल येथे विभागीय आयुक्त सौरभ राव यांच्या हस्ते होणार आहे. हे प्रदर्शन गुरुवार (ता. ९) ते रविवार (ता. १२) दरम्यान क्रिएटी सिटी येथे सकाळी ११ ते सायंकाळी ७ या वेळेत सर्वांसाठी खुले राहणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

AAP vs Raghav Chadha : राघव चढ्ढा पंतप्रधान मोदींविरोधात बोलायला घाबरतात, 'आप'चे आपल्याच खासदारावर गंभीर आरोप

Video : अन्नपूर्णा आजी कमळीला घरातून हाकलणार ! प्रोमो पाहून प्रेक्षकांना बसला शॉक; "आता मालिका बघणं बंद"

Multibagger Stock: 1 लाखाचे झाले 39 लाख; या शेअरने दिला 3900% रिटर्न! अजूनही 80% वाढण्याचा ब्रोकरेजचा अंदाज

School Development: शासनाचा निर्णय! माजी विद्यार्थ्यांच्या बळावर होणार शाळांचा कायापालट; शाळांमध्‍ये संघाची स्थापना..

Sangli Civil Hospital : सांडपाणी प्रकल्प रखडला; ‘सिव्हिल’कडून साडेचार कोटींचा दंड भरला

SCROLL FOR NEXT