पुणे

आजी-आजोबा, लहान मुलांनी धुलिवंदनाला केली रंगांची उधळण

CD

पुणे, ता. ७ : चोहोबाजूंनी सप्तरंगांची होणारी उधळणं...अन्‌ नात्यांच्या ओलाव्यात चिंब भिजण्याचा क्षण....संगीताच्या तालावर थिरकणारी पावलं...अन्‌ क्षणाक्षणाला अधिकाधिक वृद्धिंगत होणारा उत्साह अशा जल्लोषपूर्ण वातावरणात मुलांसह आजी-आजोबांनीही धुलिवंदनाचा आनंद लुटला.

भोई प्रतिष्ठानतर्फे दरवर्षीप्रमाणे यंदाही ‘रंग बरसे’ महोत्सवाचे टिळक आयुर्वेद महाविद्यालयाच्या मैदानात आयोजन करण्यात आले होते. गेल्या २७ वर्षांपासून सुरू असलेल्या महोत्सवात यंदा विविध संस्थांमधील १७०० हून अधिक मुल-मुली सहभागी झाले. अस्तित्व गुरुकुल (वीर, सासवड), ज्ञानगंगोत्री मतिमंद मुलांचे विद्यालय, अक्षरस्पर्श मतिमंद मुलांचे विद्यालय, जिजाऊ फाउंडेशन, सूर्योदय फाउंडेशन, लुई ब्रेल अंध संस्था, समर्पण संस्था, घरट प्रकल्प (सासवड), सेवाधाम वृद्धाश्रम, माय माऊली वृद्धाश्रम अशा विविध संस्था महोत्सवात सहभागी झाल्या होत्या. तब्बल शंभर पोती नैसर्गिक रंग, पाण्याचे फवारे, रंगासोबतच फुलांची होणारी उधळण अशा वातावरणा हा दिवस साजरा करण्यात आला. विविध मराठी, हिंदी गाण्यांवर ताल धरत मुलांनी मनसोक्त नृत्य करण्याचा आनंद घेतला. या उपक्रमात भोई प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. मिलिंद भोई, आमदार रवींद्र धंगेकर, अतिरिक्त पोलिस आयुक्त जालिंदर सुपेकर, राजेंद्र डहाळे, तसेच ‘चांगुलपणा चळवळी’चे विराज देशमुख, धनश्री वाघ पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sangli Lok Sabha : संजय पाटील विरुद्ध विशाल पाटील यांच्यात 'टशन'; माजी मंत्र्यांच्या भूमिकेमुळे निवडणूक बनली लक्षवेधी

Sunidhi Chauhan: भर कॉन्सर्टमध्ये प्रेक्षकानं बॉटल फेकून मारली; पण ती डगमगली नाही, सुनिधी चौहाननं दिलं सडेतोड उत्तर

Elon Musk Scam : इलॉन मस्कने म्हटलं 'आय लव्ह यू', अन् तरुणीवर झाला कर्जाचा डोंगर.. काय आहे प्रकरण?

'आम्ही सुद्धा थोडं क्रिकेट खेळलोय...' भारताच्या सर्वश्रेष्ठ फलंदाजाने विराटवर ओढले ताशेरे, चॅनलला देखील दिला इशारा

Zakia Wardak: अफगाणिस्तानी अधिकारी करायची तस्करी, दुबईहून 19 कोटींचे सोने आणताना मुंबईत पकडले

SCROLL FOR NEXT