पुणे

अवतीभवती

CD

सावित्रीबाई फुले यांना अभिवादन
पुणे, ता. १० ः क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या १२६ व्या स्मृतीदिनानिमित्त अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेतर्फे गंज पेठेतील महात्मा फुले वाडा येथील सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. तसेच, छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. याप्रसंगी परिषदेच्या प्रदेशाध्यक्षा मंजिरी धाडगे, माजी नगरसेविका मनिषा लडकत, पुणे विभाग अध्यक्ष प्रीतेश गवळी, कार्याध्यक्ष सागर दरवडे, गौरी पिंगळे, प्रदीप हुमे, रवी लडकत, महेश बनकर, सुधीर होले आदी उपस्थित होते.

चारूशीला बेलसरे यांना जीवनगौरव पुरस्कार
पुणे, ता. १० ः ज्येष्ठ गायिका चारूशीला बेलसरे यांना ‘मॉम इंडिया कॅसेट कंपनी’तर्फे जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. कंपनीच्या संचालिका उज्वला भंडारी यांच्या हस्ते व कंपनीचे मुख्य व्यवस्थापक मोहन भंडारी यांच्या उपस्थितीत समारंभपूर्वक हा पुरस्कार देण्यात आला. बेलसरे यांनी ‘हिट्स ऑफ लता’ या मॉम इंडियाने प्रसारित केलेल्या कॅसेटमध्ये १५ गीते गायली होती. त्या चित्रपट गीते, सुगम संगीत, भक्तिगीते, भावगीते, शास्त्रीय संगीत आदींचे विविध कार्यक्रम सादर करतात.

चित्रकला प्रदर्शनाचे उद्‌घाटन
पुणे, ता. १० : ‘‘एखादी कला जोपासत त्या कलेशी एकरूप झाल्यानंतर ती कला मनाला सुंदर बनवते. ही कलेची खरी ताकद आहे,’’ अशी भावना शहर पोलिस उपायुक्त स्मार्तना पाटील यांनी व्यक्त केली. योगिनी आडकर, भाग्यश्री जोशी-थत्ते या महिला कलाकारांच्या बालगंधर्व कलादालनात आयोजित चित्र प्रदर्शनाच्या उद्‌घाटन समारंभात त्या बोलत होत्या. यावेळी अॕड. मकरंद आडकर, माजी महापौर श्रीकांत शिरोळे, योगिनी आडकर आदी उपस्थित होते. ‘‘आज सर्वच क्षेत्रात स्त्रियांनी आपले अस्तित्व निर्माण केले आहे. हीच खरी परिवर्तनाची नांदी आहे’’, असेही पाटील यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Team India Selection : रिषभ पंतला वन डे संघात स्थान नाही, पण मिळाले कर्णधारपद; Asian Games साठीच्या संघातही दोन बदल, भन्नाट टीम्स

MPSC Paper Leak : एमपीएससी अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी; अभिजीत दिपकेंचं उमेदवारांना आंदोलनाचं आवाहन

Umarga News : उमरगा सामाजिक वनीकरण विभागात भ्रष्टाचाराचा आरोप; कारवाईत दिरंगाईमुळे युवासेनेकडून वनरक्षकावर शाईफेक

India Squad for WI Series: हार्दिक पांड्या संघाबाहेरच, जसप्रीत बुमराहचेही नाव गायब; ऋतुराज गायकवाडची वापसी, तर एक सप्राईज पॅकेज, जाणून घ्या भन्नाट टीम इंडिया

Censor Board: केंद्राकडून सेन्सॉर बोर्डाची फेररचना! १८ सदस्यांची निवड; निशिगंधा वाड, वामन केंद्रे, मनोज जोशींचा समावेश

SCROLL FOR NEXT